सोयाबीन पेरणीची भरपाई कंपन्यांकडून वसूल करा : राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:52 PM2020-07-01T12:52:52+5:302020-07-01T12:54:58+5:30

बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात बहुतांशी पेरण्या झाल्या असून उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असून सोयाबीन पेरणीची नुकसान भरपाई बियाणे विकणाऱ्या कंपन्यांकडून वसूल करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Recover soybean sowing compensation from companies | सोयाबीन पेरणीची भरपाई कंपन्यांकडून वसूल करा : राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोयाबीन पेरणीची भरपाई कंपन्यांकडून वसूल करा : राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next
ठळक मुद्देसोयाबीन पेरणीची भरपाई कंपन्यांकडून वसूल कराराजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जयसिंगपूर : बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात बहुतांशी पेरण्या झाल्या असून उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असून सोयाबीन पेरणीची नुकसान भरपाई बियाणे विकणाऱ्या कंपन्यांकडून वसूल करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी बोगस बियाण्यांच्या तक्रारी येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर सोयाबीनची पेरणी करून देखील उगवण झालेली नाही. सोयाबीनच्या पेरणीस हेक्टरी १२ हजार ५०० रुपये इतका खर्च येतो. मान्सूनचा पाऊस सुरू होऊन राज्यात बहुतांश पेरण्या झालेल्या आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात उगवण झालेली नाही.

कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडून बोगसगिरी करण्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सोयाबीन पेरणीची नुकसान भरपाई बियाणे विकणाऱ्या कंपन्यांकडून वसूल करावी, अशी अशी मागणी माजी खासदार शेट्टी यांनी केली आहे.

Web Title: Recover soybean sowing compensation from companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.