वार्षिक निरीक्षण पथकाच्या सरबराईसाठी लाखोंची वसुली

By admin | Published: February 5, 2015 11:16 PM2015-02-05T23:16:06+5:302015-02-05T23:16:06+5:30

वार्षिक निरीक्षणासाठी आलेल्या पथकाच्या सरबराईच्या नावाखाली लाखोंची वसुली करण्यात आली. विशेष महानिरीक्षकांच्या निरीक्षणादरम्यान यवतमाळ पोलीस उपविभागातील

Recovery of lakhs of rupees for the annual inspection team | वार्षिक निरीक्षण पथकाच्या सरबराईसाठी लाखोंची वसुली

वार्षिक निरीक्षण पथकाच्या सरबराईसाठी लाखोंची वसुली

Next

राजाराम पाटील- इचलकरंजी -यंत्रमाग कापडाला मागणी नसल्याने उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कापडाची विक्री होत आहे. अशा मंदीच्या काळातच वीज दरवाढ, कामगारांची वाढणारी मजुरी व व्यापाऱ्यांकडून खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीत वाढ न होणे अशा तिहेरी कचाट्यात येथील वस्त्रोद्योग सापडला आहे. परिणामी यंत्रमागधारकांबरोबर कापड उत्पादकही धास्तावले आहेत.शहर व परिसरात सुमारे सव्वा लाख यंत्रमाग आहेत. त्यापैकी ५० टक्के यंत्रमागांवर केम्ब्रिक पद्धतीने कापड उत्पादन होते. कॉटन व पॉलिस्टर अशा दोन्ही प्रकारच्या धोतीचे १० ते १५ टक्के आणि उर्वरित यंत्रमागांवर मोठा पन्ना, पॉलिस्टर पद्धतीच्या पीव्ही-पीसी सुताच्या कापडाची निर्मिती होते, तर साधारणत: पाच टक्क्यांपेक्षा कमी यंत्रमागांवर नक्षीकाम-बुट्टा प्रकारचे कापड उत्पादित होते; पण या कापडाला सातत्याने चांगली मागणी असते. मात्र, उपरोक्त उल्लेखनीय अन्य प्रकारच्या यंत्रमाग कापडाला मागणी मंदावल्याने हा यंत्रमाग उद्योग आर्थिक मंदीच्या फेऱ्यात अडकला आहे.लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ सप्टेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर वस्त्रोद्योगामध्ये परिस्थिती सुधारेल, अशी आशा यंत्रमागधारकांना होती. त्यानंतर उलट सुताचे दर वाढत गेले; पण त्याप्रमाणात कापडाचे दर वाढले नाहीत. याचा परिणाम म्हणून उत्पादित खर्चापेक्षा कापडास दर कमी मिळू लागला आणि कापड उत्पादक यंत्रमागधारक व व्यापाऱ्यांना नुकसान होऊ लागले. हीच परिस्थिती पुढे कायम राहिली आहे.सरकारने वाढीव वीज दरापोटी दिलेले अनुदान बंद झाल्यामुळे आणि महावितरण कंपनीने आणखीन वीज दरामध्ये वाढ करण्याची मागणी केल्यामुळे साधारणत: ३५ टक्के वीज दरवाढ अपेक्षित आहे. त्याचबरोबर लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार राज्य शासनाने २९ जानेवारीपासून यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी नवीन किमान वेतनाची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार कामगारांच्या मजुरीमध्ये सुमारे ३० ते ४० टक्के वाढ होण्याचा दावा कामगार संघटनेचा आहे, तर शहर व परिसरात असणाऱ्या एकूण यंत्रमागांपैकी ४० टक्के खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीवाढ देण्यास कापड व्यापाऱ्यांनी नकार दर्शविला आहे. वस्त्रोद्योगात असणाऱ्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर वरीलप्रमाणे वीज दरवाढ, कामगारांची मजुरीवाढ व खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीत वाढ करण्यास व्यापाऱ्यांनी दिलेला नकार, असे तिहेरी संकट यंत्रमाग उद्योगामध्ये येऊ लागले आहे.

आॅटोलूमच्या जॉब रेटमध्ये घट
येथील वस्त्रोद्योगामध्ये सुमारे २५ हजार सेमी आॅटो व आॅटो लूम्स आहेत. वस्त्रोद्योगामधील मंदीचा परिणाम या क्षेत्रावरसुद्धा झाला आहे. शटललेस लूमच्या मजुरीमध्ये लक्षणीय घट झाली असून, ही मजुरी १२ ते १३ पैसे प्रतिमीटर इतकी झाली आहे. याचबरोबर रूटी-सी, रूटी-बी या लूमच्या मजुरीमध्येसुद्धा घट झाली असून, ती १४ ते १६ पैसे इतकी उतरली आहे.

Web Title: Recovery of lakhs of rupees for the annual inspection team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.