भरतीत कोरोना काळातील डाटा एंट्री ऑपरेटरना प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:27 AM2021-08-26T04:27:28+5:302021-08-26T04:27:28+5:30

राष्ट्रीय आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा पातळीवर कंत्राटी कर्मचारी भरण्यासाठी एजन्सी नेमण्याचे अधिकार होते. परंतु, आता हे अधिकार रद्द करून राज्यासाठी ...

In recruitment, give preference to data entry operators of Corona period | भरतीत कोरोना काळातील डाटा एंट्री ऑपरेटरना प्राधान्य द्या

भरतीत कोरोना काळातील डाटा एंट्री ऑपरेटरना प्राधान्य द्या

Next

राष्ट्रीय आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा पातळीवर कंत्राटी कर्मचारी भरण्यासाठी एजन्सी नेमण्याचे अधिकार होते. परंतु, आता हे अधिकार रद्द करून राज्यासाठी एकच एजन्सी नेमण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना स्थानिक एजन्सीकडून कार्यमुक्त करण्यात आले आहे. यामुळे बेरोजगार झालेल्या ४० हून अधिक कर्मचाऱ्यांनी डॉ. साळे यांची भेट घेऊन काम केलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांना नव्या भरतीत संधी मिळावी अशी विनंती केली, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

संबंधित एजन्सीचे चालक लवकरच येणार असून, अध्यक्ष, अन्य पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून जुन्या आणि अनुभवी पदवीधर डाटा एंट्री ऑपरेटरना पुन्हा कामाची संधी देण्याचा आग्रह धरण्याची ग्वाही डॉ. साळे यांनी यावेळी या सर्वांना दिली.

Web Title: In recruitment, give preference to data entry operators of Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.