सैन्यभरती प्रक्रिया राबवण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:21 AM2021-03-24T04:21:56+5:302021-03-24T04:21:56+5:30

कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांपासून थांबलेली सैन्य भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी सेवाव्रत प्रतिष्ठानने मंगळवारी केली. याबाबतचे निवेदन ...

Recruitment process should be implemented | सैन्यभरती प्रक्रिया राबवण्यात यावी

सैन्यभरती प्रक्रिया राबवण्यात यावी

Next

कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांपासून थांबलेली सैन्य भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी सेवाव्रत प्रतिष्ठानने मंगळवारी केली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मार्च २०१९ नंतर आजअखेर सैनिक भरती झालेली नाही. गेले वर्षभर कोरोनाने ही प्रक्रिया थांबवण्यात आली. यावर्षी मार्च महिन्यात दोनवेळा सैन्य भरतीची तारीख जाहीर करण्यात आली होती; पण जिल्हा प्रशासनाने त्यास मान्यता दिली नाही. भरतीची वयोमर्यादा २३ असल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून तयारी करत असलेले युवक ही संधी जाईल, या विचाराने तणावात आहेत. तरी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन भरती प्रक्रिया राबवण्यात यावी. यावेळी बंडा साळुंखे, मनोहर सोरप, नीतेश कोकीतकर, संजय पाटील यांच्यासह युवक उपस्थित होते.

---

Web Title: Recruitment process should be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.