कोल्हापूर जिल्ह्यात रेड अलर्ट : नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 07:07 PM2021-07-20T19:07:29+5:302021-07-20T19:10:16+5:30

Rain Flood Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात  दोन दिवस जोरदार पाऊस होणार असून जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट दिला आहे. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी या सहा तालुक्यात धुवांदार पाऊस कोसळणार असून नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Red alert in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात रेड अलर्ट : नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यात रेड अलर्ट : नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Next
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात रेड अलर्ट : नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारागगनबावडा, राधानगरी, चंदगडसह सहा तालुक्यात धुवांदार

कोल्हापूर : जिल्ह्यात  दोन दिवस जोरदार पाऊस होणार असून जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट दिला आहे. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी या सहा तालुक्यात धुवांदार पाऊस कोसळणार असून नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. मंगळवारी सकाळपासून तर गगनबावड्यासह शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात संततधार सुरु राहिली. दिवसभर एकसारखा पाऊस सुरु असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.

कोल्हापूर शहरात दिवसभर रिपरिप राहिली असून अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर असून विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

पंचगंगेची पातळी २७ फुटापर्यंत पोहचली असून पंधरा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. खरीप पिकांना पोषक पाऊस सुरु आहे. शिवारात पाणी तुंबल्याने भात पिकांची वाढ चांगली सुरु आहे.
 

Web Title: Red alert in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.