कुत्र्यांना पळविण्यासाठी घर व परिसरात लाल पाण्याच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:53 PM2018-11-02T23:53:53+5:302018-11-03T00:00:04+5:30

भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. मात्र कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी इथल्या नागरिकांनी एक विचित्र उपाय केला आहे. अनेकांनी घराच्या बाहेर, बिल्डिंग, आॅफिस कार्यालय,या ठिकाणी सगळीकडे लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्या आहेत.

Red water bottles in the house and premises to run the dogs | कुत्र्यांना पळविण्यासाठी घर व परिसरात लाल पाण्याच्या बाटल्या

कोल्हापूर / उचगाव परिसरात अशा लाल पाण्याने भरलेल्या बाटल्या ठेवलेल्या दिसतात.

googlenewsNext
ठळक मुद्देसंख्या आहे तेवढीच त्यांचा उपद्रवही कमी झालेला नाही.असा तर्क नागरिकांनी काढला असून, त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू केली

उचगाव/कोल्हापूर : उचगाव,सरनोबतवाडी, उजळाईवाडी या उपनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. मात्र कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी इथल्या नागरिकांनी एक विचित्र उपाय केला आहे. अनेकांनी घराच्या बाहेर, बिल्डिंग, आॅफिस कार्यालय,या ठिकाणी सगळीकडे लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्या आहेत. या बाटलीतील पाणी बघितल्यानंतर कुत्रे याठिकाणी येत नसल्याचं नागरिकांचं म्हणणे आहे.

उपनगरातील अनेक इमारतींच्या प्रवेशद्वारावर तसेच घरासमोर लाल रंगाच्या पाण्याने भरलेल्या बाटल्या पहायला मिळतात. येणाऱ्या -जाणाºयांना याचे कुतूहल वाटत आहे. पण हा नेमका काय प्रकार आहे. याची माहिती घेतली असता भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ही अफलातून कल्पना केल्याचे समजले. यात काही अंशी यश आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

उपनगर परिसरात सर्वच भागात मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रस्त्याने ये-जा करताना ही कुत्री सरळ नागरिकांच्या किंवा वाहनचालकांच्या अंगावर धावून जात असतात. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची गरज असताना निर्बिजीकरण केल्यावर कुत्र्यांची नवी पिढी जन्माला येणार नाही. परंतु, कुत्र्यांची सध्याची संख्या आहे. तेवढीच राहिली आहे. त्यांचा उपद्रवही कमी झालेला नाही.

कुंकू किंवा लाल रंगाचा वापर करून हे पाणी तयार करण्यात येत आहे. हे पाणी एका प्लास्टिकच्या बाटलीत भरून ते घराच्या दाराजवळ ठेवल्यास कुत्रे याठिकाणी येत नाहीत, असा तर्क नागरिकांनी काढला असून, त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू केली आहे.

सत्य काय ?
एखादी नवीन वस्तू दिसल्यानंतर माणूसही त्या वस्तूला पाहून घाबरतो. त्याचप्रमाणे कुत्रीही त्या बाटल्यांना किंवा त्यातील लाल रंगाला पाहून घाबरत असावेत, असे प्राणिमित्रांनी सांगितले.

 

Web Title: Red water bottles in the house and premises to run the dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.