रेडेकर, सर्वोदया स्कूलला विजेतेपद रेडेकर, सर्वोदया स्कूलला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:27 AM2021-03-09T04:27:15+5:302021-03-09T04:27:15+5:30

अंतिम सामन्यात तुल्यबळ साधना हायस्कूलला नवोदित केदारी रेडेकर स्कूलने पूर्ण वेळेत गोल शून्य बरोबरीत रोखले. टायब्रेकरमध्ये रेडेकरचा बदली गोलरक्षक ...

Redekar, Sarvodaya School wins Redekar, Sarvodaya School wins | रेडेकर, सर्वोदया स्कूलला विजेतेपद रेडेकर, सर्वोदया स्कूलला विजेतेपद

रेडेकर, सर्वोदया स्कूलला विजेतेपद रेडेकर, सर्वोदया स्कूलला विजेतेपद

googlenewsNext

अंतिम सामन्यात तुल्यबळ साधना हायस्कूलला नवोदित केदारी रेडेकर स्कूलने पूर्ण वेळेत गोल शून्य बरोबरीत रोखले. टायब्रेकरमध्ये रेडेकरचा बदली गोलरक्षक युवराज संकपाळने २ पेनल्टीचे फटके अडवून ४-२ अशा विजयात मोलाचा वाटा उचलला.

रेडेकरच्या तुषार कांबळे, सौरभ मोहिते, रोहन भोसले, श्रवण जाधव यांनी तर साधनच्या राहुल पोवार, सुशांत पोवारने गोल केले.

१४ वर्षे गटातही सर्वोदया स्कूल व न्यू होराईझन यांच्यातील सामना गोल शून्य बरोबरीत सुटला. टायब्रेकरमध्ये सर्वोदयाच्या वेद चौगुले, तेजस बारबल, ऋषीकेश कांबळे तर होराईझनच्या श्रेयस नाईक, आदित्य पाटील यांनी गोल करून संघाला ३-२ ने विजय मिळवून दिला.

विद्या प्रसारक मंडळाचे अ‍ॅड. बी. जी भोसकी, अरविंद कित्तूरकर, किशोर हंजी, गजेंद्र बंदी, युनायटेडचे उपाध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद, बसवप्रभू लोणी यांच्याहस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना प्रमाणपत्रे, भेटवस्तू व चषक देण्यात आले.

यावेळी खजिनदार महादेव पाटील, समन्वयक हुल्लाप्पा सूर्यवंशी, कुपिंदर पोवार यांचा गौरव झाला. सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविक केले. सूरज तेली, प्रसन्न प्रसादी, सौरभ जाधव यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

--------------------------

* सर्वोत्कृष्ट खेळाडू :

तुषार कांबळे, आदित्य पाटील (गोलरक्षक), सौरभ मोहिते, श्रेयस नाईक (बचावपट्टू), हिमांशू पोवार, पार्थ कुरबेट्टी (मध्यरक्षक), पार्थ यादव, वर्धन कांबळे (आघाडीपटू)

--------------------------

* फोटो ओळी : गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे झालेल्या डॉ. घाळी चषक शालेय फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या केदारी रेडेकर संघाला बक्षीस देऊन गौरविताना गजेंद्र बंदी, बी. जी भोसकी, अरविंद कित्तूरकर, किशोर हंजी, मल्लिकार्जून बेल्लद, बसवप्रभू लोणी, महादेव पाटील आदी. (आशपाक किल्लेदार)

क्रमांक : ०८०३२०२१-गड- ०२

Web Title: Redekar, Sarvodaya School wins Redekar, Sarvodaya School wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.