रेडीरेकनर दरात सरासरी ७.३० टक्के दरवाढ

By admin | Published: April 2, 2017 12:53 AM2017-04-02T00:53:34+5:302017-04-02T00:53:34+5:30

घरे महागणार; अपरिहार्य नैसर्गिक दरवाढ

Redirection rates at an average 7.30 percent rate increase | रेडीरेकनर दरात सरासरी ७.३० टक्के दरवाढ

रेडीरेकनर दरात सरासरी ७.३० टक्के दरवाढ

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील रेडीरेकनरच्या दरात सरासरी ७.३० टक्के वाढ झाली आहे. राज्य सरकारने राज्यातील विविध शहरांतील रेडीरेकनरचे दर शनिवारी जाहीर केले. नोटाबंदीमुळे सर्वच क्षेत्रांत मंदी आली होती. आता रेडीरेकनरच्या दरवाढीमुळे बांधकाम क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता सूत्रांनी बोलून दाखविली. कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात १० टक्के, प्रभावक्षेत्रात ११.६३ टक्के, नगरपालिका क्षेत्रात ५.५० टक्के, तर महानगरपालिका क्षेत्रात ३ टक्के अशी रेडीरेकनरच्या दरात वाढ झाल्याचे सांगण्यात आले. या दरवाढीबाबत दिवसभर संभ्रमावस्था होती. आधीच्या माहितीनुसार १० ते १५ टक्के वाढ झाली असे सांगण्यात येत होते; परंतु अधिकृत माहिती कोणाकडूनही मिळत नव्हती. बांधकाम व्यावसायिक दिवसभर आॅनलाईनवर माहिती मिळते का, याची प्रतीक्षा करीत होते. रात्री उशिरा याबाबत अनधिकृतपणे माहिती उपलब्ध झाली. नोटाबंदीमुळे आधीच सर्व क्षेत्रांवर मंदीचे सावट असताना आता नव्याने रेडीरेकनरचे दर वाढवून नव्या अडचणी वाढवू नका, अशी मागणी ‘क्रिडाई’च्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन केली होती. त्यामुळे या वर्षी वाढ होणार नाही, अशी अपेक्षा होती; परंतु राज्य सरकारला नोटाबंदीमुळे तीन हजार कोटींवर कमी महसूल मिळाला. त्यामुळे नैसर्गिक वाढ करणे अपरिहार्य होते.


रेडीरेकनरच्या दरवाढीचा परिणाम बांधकाम व्यवसायावर होणार आहे. आयकर मूल्यांकन, महापालिका प्रीमियम, जमिनीची नजराणा फी, स्टॅँप ड्यूटी यांच्यावर परिणाम होणार असल्याने बांधकामाच्या किमती वाढणार आहेत.
- राजीव परीख, क्रिडाई, राज्य उपाध्यक्ष



* शहरातील नवीन रेडीरेकनरचे दर पुढीलप्रमाणे
———————————————————
परिसर खुली जागा सदनिका कार्यालये दुकाने
——————————————————————————————————————-
* पद्माराजे गर्ल्स परिसर २१७१० ३३२१० ३६१८० ६८०२०
* महाद्वार रोड ३८०८० ४२००० ५६०३० ११७४८०
* गुजरी ५०६०० ५५२७० ६३५६० १३१०१०
* शिवाजी रोड - बिंदू चौक ५१५९० ५५४५० ६३१०० १११५२०
* गंगावेश ४९४१० ५२५०० ५६९४० ९३२९०
* रेल्वे फाटक २६२९० ४५८४० ५३७६० ११४४९०
* बागल चौक २३७१० ४६४६० ५३७६० ८८९३०
* शाहूपुरी १९४२० ४२०३० ४४८१० ५३४९०
* ताराबाई पार्क ३०८०० ५१००० ५५१४० ६९८९०
—————————————————————————————————————————-
(सूचना : वरील दर प्रतिचौरस मीटर आहेत.)

Web Title: Redirection rates at an average 7.30 percent rate increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.