कोल्हापुरात रेडीरेकनरचे दर जैसे थे दरात कोणतीही वाढ नाही : बांधकाम व्यावसायिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:18 AM2018-04-01T01:18:09+5:302018-04-01T01:18:09+5:30

कोल्हापूर : बांधकाम व्यवसायात असणारी मंदी विचारात घेता २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यातील खुली जागा, निवासी जागेच्या रेडीरेकनर दरात वाढ न करता ते ‘जैसे थे’ राहणार आहेत.

 Redirection rates in Kolhapur such as no rate increase: builders' comfort | कोल्हापुरात रेडीरेकनरचे दर जैसे थे दरात कोणतीही वाढ नाही : बांधकाम व्यावसायिकांना दिलासा

कोल्हापुरात रेडीरेकनरचे दर जैसे थे दरात कोणतीही वाढ नाही : बांधकाम व्यावसायिकांना दिलासा

googlenewsNext

कोल्हापूर : बांधकाम व्यवसायात असणारी मंदी विचारात घेता २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यातील खुली जागा, निवासी जागेच्या रेडीरेकनर दरात वाढ न करता ते ‘जैसे थे’ राहणार आहेत. त्याबाबतचे आदेश पुणे येथे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी शनिवारी दिले. त्यामुळे कोल्हापुरातील रेडीरेकनरचे दरही गेल्यावर्षीप्रमाणेच राहणार आहेत. परिणामी, जमीन व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.दरवर्षी रेडीरेकनरच्या दरात आठ ते दहा टक्क्यांची वाढ करून ते १ एप्रिलपासून जाहीर केले जातात; पण यंदा संपूर्ण राज्यभरात बांधकाम व्यवसायात असलेल्या मंदीचा विचार करता तसेच ‘२०२२ पर्यंत सर्वांना घरे’ हे शासनाचे स्वप्न साकारण्यासाठी राज्यातील रेडीरेकनरचे दर गतवर्षीप्रमाणे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

क्रिडाई आणि विविध ग्राहक संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे रेडीरेकनर दराबाबत चर्चा केली होती. अनेक मोठमोठ्या इमारती बांधून त्यातील फ्लॅट विक्रीविना पडूनच आहेत. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. याचा विचार करून नोंदणी महानिरीक्षकांनी हे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले.


रेडीरेकनरचे चौरस मीटरचे दर (ठिकाण, खुली जागा, निवासी दर रुपये)

ताराबाई रोड ते वरुणतीर्थ वेश परिसर : २४३१०, ३८८००
महाद्वार रोड ते खरी कॉर्नर ते बिनखांबी गणेश मंदिर : ३८०८०, ४२०००
बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी : ४२३८०, ४२२५०
महाद्वार रोड, मेन रोड : ५१७००, ४९९५०
गुजरी ते जोतिबा रोड : ५०६००, ५५२७०
भेंडे गल्ली परिसर : ४८६८०, ५१०७०
भाऊसिंगजी रोड ते भवानी मंडप : ५४०९०, ५६४७०
व्हीनस कॉर्नर ते दाभोळकर चौक : ४१६९०, ४७४८०
शाहूपुरी व्यापार पेठ परिसर : ३५७२०, ४७०२०
दाभोळकर चौक ते महादेव मंदिर, ताराराणी चौक परिसर : ४८३८०, ५२३५०

राजारामपुरी मेन रोड : ४४१९०, ४७९४०
रुईकर कॉलनी परिसर : १९२५०, ४२५००
हिंमतबहाद्दूर परिसर, सरलष्कर पार्क : १८८५०, ४३९८०
प्रतिभानगर, शास्त्रीनगर परिसर : १०३४०, ३९६५०
खानविलकर पेट्रोल पंप ते महावीर कॉलेज परिसर : २०५००, ४४६००
साकोली कॉर्नर ते रंकाळा : १६०१०, ३८२००
फिरंगाई परिसर (शिवाजी पेठ) : १३२००, ३६११०

बेलबाग परिसर : ८७२०, ३१३५०
शाहू व शिवाजी स्टेडियम परिसर : १०४७०, ३१३८०
गोखले महाविद्यालय परिसर : १३९६०, ३३६९०
बिंदू चौक, मिरजकर तिकटी परिसर : ३४२३०,३६२९०
सुभाषनगर परिसर : ५७५०, ३१३००
बाबा जरगनगर मेन रोड : ५०१०, ३००३०
असेंब्ली रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय : २५७४०, ४६४६०
माळी कॉलनी, टाकाळा परिसर : १४०५०, ३९९००
शिवाजी पार्क परिसर : २२९९०, ४२६२०
मार्केट यार्ड, जाधववाडी परिसर :
७८३०, ३७६४०

रेडीरेकनरचे दर वाढले की त्या प्रमाणात स्टॅम्प ड्यूटी, महापालिका चार्जेस, इन्कम टॅक्समध्ये आपोआपच वाढ होते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले असल्याचा विचार करून पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी गृहदालन प्रदर्शनामध्ये रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’चे दिलेले आश्वासन पाळले. दर कायम राहण्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- महेश यादव,अध्यक्ष, क्रिड ई कोल्हापूर

Web Title:  Redirection rates in Kolhapur such as no rate increase: builders' comfort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.