मास्कने घालविली लिपस्टिकची लाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:44+5:302021-04-29T04:17:44+5:30

सौंदर्य हा प्रत्येक स्त्रीचा दागिना आहे, सुंदर दिसणं, नटणं, मुरडणं ही जशी तिची हौस तसाच अधिकारही. त्यात आपल्या भारतीय ...

The redness of the lipstick applied by the mask | मास्कने घालविली लिपस्टिकची लाली

मास्कने घालविली लिपस्टिकची लाली

Next

सौंदर्य हा प्रत्येक स्त्रीचा दागिना आहे, सुंदर दिसणं, नटणं, मुरडणं ही जशी तिची हौस तसाच अधिकारही. त्यात आपल्या भारतीय संस्कृतीत या साजश्रृंगाराला अनन्यसाधारण महत्त्व. त्यामुळे महिला कार्पोरेट जगतात वावरणारी, हाय-फाय सोसायटीतील असो किंवा सर्वसामान्य गृहिणी, अगदी खेड्यापाड्यातली आजी, चापून चोपून घातलेली नऊवारी, नाकात दिमाखाने मिरवणारी नथ आणि तिने केसात माळलेला गजऱ्यावरून नजर हटत नाही. कुणाचे हास्य चांगले, कुणाचा चेहरा नितळ, कुणाचे लांबसडक केस, तर कुणाचा बांधा निटनेटका, कोणी सावळी, पण नाकी डोळी निटस, लोभस. हे सौंदर्य अधिकाधिक खुलवायचे असेल सौंदर्य तज्ज्ञ असलेल्या ब्युटीपार्लरमध्ये जाणं आलंच.

पण, या कोरोनाने सगळ्यांचं जगणंच बंदिस्त केलं. कुठे जाणं-येणं नाही, मित्र-मैत्रिणींनी धम्माल पार्टी नाही, महिलांची किटी नाही, महिला मंडळांच्या बैठका नाही की भिशी पार्टी नाही, लग्नही दोन तासांत आणि २५ माणसांत उरकायचे. बाकी सगळे समारंभ घरातल्या घरातच यामुळे महिलांना नटता येत नाही ही एक मोठी अडचण झाली आहे.

--

स्वत:च झाले ब्युटिशियन

लॉकडाऊनमुळे सगळं बंद असले तरी आपण रोज स्वत:ला आरशात बघताना प्रसन्न आणि उत्साह वाटला पाहिजे. ब्युटी पार्लरला जाता येत नाही म्हटल्यावर आळशीपणा केला नाही. घरातल्या घरात ब्युटी टिप्स वापरायला सुरू केल्या. आयब्रो, फेशियल, व्हॅक्सिंग, केसांची निगा या सगळ्या गोष्टी हळूहळू शिकले. आता मी सेल्फ ब्युटीशियन झाले आहे. स्वत:ला छान अपडेट ठेवते आणि छान दिसते.

स्मिता खामकर (गृहिणी)

--

पार्लरसारखा ग्लो हवा..

डान्स, फिटनेस या व्यवसायात असल्याने कायम प्रेझेंटेबल राहणं ही आमची गरज आहे. लॉकडाऊनमध्येही ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. त्यामुळे पार्लरची या काळातही किती गरज आहे, हे लक्षात येते. पार्लरमुळे महिन्यातून एक दिवस तरी स्वत:च्या सौंदर्यासाठी देता येतो. घरच्या घरी काही रेमेडिज वापरल्या तरी त्याला पार्लरमधील ब्युटिशियनकडून केल्या जाणाऱ्या ट्रिटमेंटचा परिणाम येत नाही.

प्रणाली पाटील (कोरिओग्राफर)

--

ब्युटी ट्रीटमेंट देताना महिलांना स्पर्श करावा लागतो, जवळ जावे लागते त्यामुळे कोरोनाचा धोका आम्हाला आणि महिलांनाही असल्याने व्यवसाय ठेवण्याशिवाय पर्याय नाही. दिवाळीनंतरचे काही दिवस आणि मागील दोन-तीन महिन्यांतील लग्नसराई वगळता गेल्यावर्षीपासून पार्लर बंद आहे. ज्यांच्या घरी कार्यक्रम आहे, लग्न आहे ते फोन करतात. त्यावेळीही सर्वंकष काळजी घेऊन मेकअप केला जातो.

सुनीता झेंडे (ब्युटीशियन)

--

उन्हाळ्यातील तीन महिन्यात लग्नसराई असते गेल्यावर्षी त्याचवेळी लॉकडाऊन सुरू झाला. यावर्षी पण हीच परिस्थिती. दिवाळी आणि गेल्या दोन महिन्यात चांगला धंदा झाला. पहिल्या लाटेला कसेबसे निभावून नेले. आता दुसऱ्या लाटेने मात्र घडी विस्कटली. कॉस्मॅटिकची विक्रीच थांबली.

सतीश नाणेगावकर (कॉस्मॅटिक व्यावसायिक)

--

डमी कोल डेस्कला मेल केली आहे.

--

Web Title: The redness of the lipstick applied by the mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.