रूपांतरित कर कमी करून दिलासा देऊ

By admin | Published: May 30, 2016 12:06 AM2016-05-30T00:06:34+5:302016-05-30T00:42:32+5:30

खडसे : महाडिक, देसाई यांच्या मागणीवर घोषणा

Reduce converts and give relief | रूपांतरित कर कमी करून दिलासा देऊ

रूपांतरित कर कमी करून दिलासा देऊ

Next

कोल्हापूर : रूपांतरित करासंदर्भातील दंडाच्या नोटिसा रद्द केल्या नाहीत किंवा दंडाची रक्कम माफक केली नाही तर जनभावना भाजप व सरकारच्या विरोधात जाईल, ही बाब आमदार अमल महाडिक व भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी स्वतंत्ररीत्या निवेदनाद्वारे रविवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर रूपांतरित कर कमीत कमी करून मिळकतधारकांना दिलासा देऊ, अशी घोषणा खडसे यांनी केली.
रविवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना कोल्हापूर विमानतळावर आमदार अमल महाडिक व भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी रूपांतरित करासंदर्भात स्वतंत्रपणे निवेदन दिले.
शहरातील १७००० मिळकतधारकांना ‘ब’सत्ताप्रकारांतर्गत रूपांतरित करासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसीद्वारे बजावण्यात आलेला दंड अव्वाच्या सव्वा आहे. त्यामुळे या नोटिसी रद्द कराव्यात किंवा दंडाची रक्कम कमी करावी. असे न झाल्यास आपल्याविरोधात जनभावना निर्माण होईल, असे आमदार महाडिक यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरात रूपांतरित कर लावणे ही शहरवासीय व जिल्ह्यातील ४० हजार कुटुंबीयांवर प्रभाव पाडण्यासारखे आहे. तरी याबाबत योग्य तो निर्णय त्वरित घेऊन महसूल खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देण्याची सूचना करावी, असे संदीप देसाई यांनी निवेदनाद्वारे म्हटले.
यावर तमनाकवाडा (ता. कागल) येथे भाजपतर्फे आयोजित सर्वपक्षीय पाणी परिषदेमध्ये महसूलमंत्री खडसे यांनी रूपांतरित करासंदर्भात घोषणा करून कराची रक्कम कमीत-कमी घेऊन मिळकतधारकांना दिलासा देण्यात येईल असे सांगितले. तसेच हा कर रद्द करणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Reduce converts and give relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.