यशवंत शिक्षक पतसंस्थेच्या कर्जावरील व्याजदरात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:24 AM2021-04-10T04:24:27+5:302021-04-10T04:24:27+5:30

कोविड-१९ पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार ही सभा ऑनलाइन पद्धतीने गुगल-मीट मिटिंगद्वारे संस्था कार्यालय सरूड येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलाविण्यात आली ...

Reduction in interest rates on loans of Yashwant Shikshak Patsanstha | यशवंत शिक्षक पतसंस्थेच्या कर्जावरील व्याजदरात कपात

यशवंत शिक्षक पतसंस्थेच्या कर्जावरील व्याजदरात कपात

Next

कोविड-१९ पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार ही सभा ऑनलाइन पद्धतीने गुगल-मीट मिटिंगद्वारे संस्था कार्यालय सरूड येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलाविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष विक्रम पोतदार हे होते.

या सभेत कर्जावरील व्याजदरासंदर्भात घेतलेल्या निर्णयाबाबत सभासदांनी कृतज्ञतापूर्वक समाधान व्यक्त करत संचालक मंडळाचे व सल्लागार मंडळाचे अभिनंदन केले व संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव केला.

प्रास्ताविक व अहवाल-वाचनात अध्यक्ष पोतदार यांनी गेल्या चार वर्षांतील संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर करत संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात साडेसात लाख रुपये निव्वळ नफा झाल्याचे सांगितले. यावेळी शिक्षक-नेते शिवाजी रोडे-पाटील हेमंत भालेकर यांनीही मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन संजय जगताप यांनी केले, तर आभार संपतराव पाटील यांनी मानले. या सभेस संस्थचे सर्व संचालक, सल्लागार व सभासदानी ऑनलाइनच्या माध्यमातून उपस्थिती दर्शवली.

Web Title: Reduction in interest rates on loans of Yashwant Shikshak Patsanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.