‘गोकुळ’चा गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात
By राजाराम लोंढे | Published: June 30, 2023 10:51 PM2023-06-30T22:51:01+5:302023-06-30T22:51:11+5:30
आजपासून अंमलबजावंणी : विक्री दरही कमी होणार
कोल्हापूर : काेल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ)गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आज, शनिवारपासून त्याची अंमलबजावणी होणार असून आता ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफ चा दर ३७ वरुन ३५ रुपये होणार आहे.
गेल्या सहा महिन्यात दूधाचे उत्पादन आणि मागणी यामध्ये तफावत राहिल्याने दूध दर तेजीत होती. मात्र, महिन्याभरापासून गाय दूध पावडरच्या दरात मोठी घसरण झाल्याने संघांना आर्थिक फटका बसत होता. त्यामुळे खरेदी दर कमी करावेत, अशी मागणी खासगी व सहकारी दूध संघांची होती.
शुक्रवारी कोल्हापूरात एका खासगी दूध डेअरीमध्ये झालेल्या बैठकीत दोन रुपये दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्री दरातही कपात हाेणार असून सोमवार (दि. ३) पासून अंमलबजावणी होणार आहे.