शेतीपंपाच्या वीजपुरवठ्यात कपात

By Admin | Published: May 10, 2017 12:50 AM2017-05-10T00:50:25+5:302017-05-10T00:50:25+5:30

ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय : आणखी दोन तास वीज कपात वाढ, शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया

Reduction in power supply to agriculture | शेतीपंपाच्या वीजपुरवठ्यात कपात

शेतीपंपाच्या वीजपुरवठ्यात कपात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क --कोपार्डे : शासन कोणाचेही असू दे कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करायची असेल तर त्याची सुरुवात शेतकऱ्यांपासूनच करावयाची हा जणू अजेंडाच ठरला आहे. ५ मेपासून शेतीपंपासाठी १२ तास सुरू असलेला वीजपुरवठा दोन तास कमी करण्याबरोबर त्याच्या वेळेत बदल करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार ‘महावितरण’ने केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहेत.
पावसाळा संपताच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी सलग बारा तास वीज देण्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा हवेतच विरली. जानेवारी महिन्यात १२ तासांची वीज आठ तासांवर आणून शासनाने शेतकऱ्यांना धक्का दिला. यावर माध्यमांनी शेतकऱ्यांच्या संतापाला वाचा फोडल्यानंतर महावितरणने हा वीजपुरवठा दहा तास केला. मात्र, काही दिवसांतच रात्रीच्या वीजपुरवठ्यात बदल न करता दिवसा होणाऱ्या वीजपुरवठ्यात पुन्हा दोन तास कपात करून दिवसा आठ तास वीज देण्याचा निर्णया झाला, तर रात्री दहा तास वीजपुरवठा शेतीपंपांना देण्यास सुरुवात केली.
यामध्ये पुन्हा बदल करून महावितरणने ५ मेपासून रात्री शेतीपंपांना दिला जाणारा वीजपुरवठा आठ तास केला असून रात्री ९ ते सकाळी ७ ऐवजी मध्यरात्री १२.४५ ते सकाळी ८.४५ असा वीजपुरवठा वेळेत बदल केला असून मध्यरात्री शेतकऱ्यांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. एवढेच नाही तर ही आठ तास केला जाणारा वीजपुरवठा सलगपणे नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सध्या ऊसपिकाबरोबर सूर्यफुल, भात, मका या रब्बी पिकांना उन्हाच्या तडाख्याने पाण्याची गरज असते. अशावेळी सलग वीजपुरवठा मिळत नसल्याने पाणी देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नदी, विहिरीमध्ये पाणी असून देखील विजेअभावी शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणे अवघड झाले आहे.


वीज आल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाटात पाणी
जिल्ह्यातील बहुतांश भागात नदीपासून दूरवर असणाऱ्या क्षेत्रासाठी काही शेतकऱ्यांनी बँकांची कर्जे काढून नऊ ते दहा हजार फूट पाईपलाईन टाकल्या आहेत. लाईट आली की, किमान अर्ध्या तासानंतर पाटात पाणी पडते. यामुळे मध्येच अचानक वीज गेल्यास हीच अवस्था होत असल्याने सलग वीज मिळत नसल्याने व जेवढी वेळ वीज गेली तेवढी वाढ मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.



पाण्याची आवश्यकता असताना महावितरणने अचानक वीजपुरवठ्यात कपात करण्याबरोबर वेळेत बदल केल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबर सलग वीजपुरवठा होत नसल्याने पाण्याच्या फेरांमध्ये अंतर वाढत असून, संस्थाचालक व शेतकऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार होत आहेत. दिवसा दहा तास सलग वीज दिली तरच ऊसपीक वाचणार आहे.
- सुभाष पाटील, अध्यक्ष केदारलिंग
पाणीपुरवठा संस्था, वाकरे, ता. करवीर.

Web Title: Reduction in power supply to agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.