बिद्री साखर कारखान्यात वाहनांना रिफ्लेक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:23 AM2021-02-12T04:23:15+5:302021-02-12T04:23:15+5:30
सरवडे : बिद्री साखर कारखान्याच्या वतीने ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक यांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले. यामुळे ...
सरवडे : बिद्री साखर कारखान्याच्या वतीने ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक यांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले. यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या असल्यामुळे ट्रॅक्टरचालकाला पाठीमागून आलेल्या वाहनांचा अंदाज येत नाही. रात्रीच्या वेळी पाठीमागून आलेल्या वाहनांना पुढे उसाचा ट्रॅक्टर आहे, हे केवळ न दिसल्याने अपघात होत आहेत. याचाच विचार करून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊ नयेत म्हणून वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले आहेत. या रिफ्लेक्टरमुळे अपघात होण्यापासून सावध होता येणार आहे. याप्रसंगी मुरगूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, शेती अधिकारी बी. एन. पाटील, सुरक्षा अधिकारी एन. डी. वाईंगडे, केनयार्ड सुपरवायझर शिवाजी केसरकर, माजी संचालक आनंदराव फराकटे, संभाजी पाटील, वसंतराव पाटील यांच्यासह विविध खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
................... फोटो
बिद्री साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. यावेळी उपस्थित सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, बी. एन. पाटील, एन. डी. वाईंगडे, शिवाजी केसरकर, आदी उपस्थित होते.