पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न शासनाकडून मार्गी

By admin | Published: February 20, 2016 12:28 AM2016-02-20T00:28:22+5:302016-02-20T00:41:00+5:30

सत्यजित पाटील-सरुडकर : शाहूवाडी तालुक्यातील सोनुर्ले प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप

Regarding the question of rehabilitation | पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न शासनाकडून मार्गी

पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न शासनाकडून मार्गी

Next

कोल्हापूर : पुनर्वसनाचा १६ वर्षे रखडलेला प्रश्न सध्याच्या सरकारने त्वरित निकाली काढला. त्यामुळे शासन पारदर्र्शी व गतिमान झाल्याचा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी गुरुवारी येथे केले. शाहूवाडी तालुक्यातील सोनुर्ले लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांपैकी ३४ प्रकल्पग्रस्तांना पाटील-सरुडकर यांच्या हस्ते जमिनींंचे वाटप करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. सोनुर्ले प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप करण्याचा कार्यक्रम सोनुर्ले ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए. ए. इनामदार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंंशी, उपकार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, पंचायत समितीचे सदस्य नामदेवराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार सरुडकर-पाटील म्हणाले, या पंचक्रोशीत शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणे ही बाब महत्त्वाची होती. प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे पंचक्रोशीतील सोनुर्ले, परळी, नांदगाव येथील १२०० एकर जमीन सिंचनाखाली येईल व शेती फुलेल. पुनर्वसनाचा प्रश्न शासनाने केवळ सोडविलाच नाही, तर प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीच्या वाटपाचे दाखले त्यांच्या दारात येऊन दिले, ही अतिशय सकारात्मक बाब आहे. या धरणाचा निधी आणि आराखडा याबाबतचे प्रश्नही लवकरच मार्र्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
ते पुढे म्हणाले, सोनुर्ले गावातील १२ हेक्टर गायरान जमिनीवर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी आपले अधिकार व गुणवत्ता यांचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी केला तर जनतेचे बराच काळ प्रलंबित असलेले प्रश्न सहजतेने सुटू शकतात, हे यानिमित्ताने दिसून आले आहे.
अप्पर जिल्हाधिकारी पवार म्हणाले, सोनुर्ले प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनींचा सातबारा सात दिवसांत देण्यात येईल. जिल्ह्णात ५४ मोठ्या धरणांची कामे सुरू असून सोनुर्ले लघुपाटबंधारे प्रकल्पबाधित ३४ प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्र्गी लागला आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. कडवी धरणग्रस्त व वारणा धरणाच्या उर्वरित ४२ प्रकल्पग्रस्तांचेही प्रश्न मार्र्गी लागतील.
लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता इनामदार यांनी धरणाचा निधी, आराखडा आणि पुनर्वसन हे तिन्ही प्रश्न सोडविण्यात आमदार पाटील यांनी दिलेल्या योगदानाबद्दल विभागातर्फे त्यांचे आभार मानले. पंचायत समितीचे सदस्य नामदेवराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Regarding the question of rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.