प्रादेशिक आराखडा अंतिम मंजुरीसाठी ३१ मार्चपर्यंत होणार सादर

By admin | Published: March 18, 2017 06:54 PM2017-03-18T18:54:48+5:302017-03-18T18:54:48+5:30

विभागीय आयुक्त ; बायपास रोडवर सर्वाधिक हरकती

Regional Plan for Final Approval till March 31 | प्रादेशिक आराखडा अंतिम मंजुरीसाठी ३१ मार्चपर्यंत होणार सादर

प्रादेशिक आराखडा अंतिम मंजुरीसाठी ३१ मार्चपर्यंत होणार सादर

Next

आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला जिल्ह्याचा प्रादेशिक आराखडा प्रादेशिक नियोजन मंडळाच्या शिफारशीनंतर अंतिम मंजूरीसाठी ३१ मार्चपर्यंत राज्य शासनाला सादर केला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
ताराबाई पार्क येथील रेसीडेन्सी क्लब येथे विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चोक्कलिंगम म्हणाले, पुढील २० वर्षांच्या विकासाचा साकल्याने विचार करून जिल्ह्यासाठी तयार केलेल्या प्रादेशिक आराखड्यावर हरकती प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त हरकती या बायपास रोडवर आहेत. या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी नेमलेल्या उपसमितीने हे काम पूर्ण केले आहे. त्यांच्याकडून याबाबतचा अहवाल प्रादेशिक नियोजन मंडळाला सादर केला जाईल. यावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील हे मंडळ यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करुन राज्य शासनाला पाठविणार आहे. ३१ मार्चपर्यंत हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठविला जाणार आहे. यावर शासन पुढील निर्णय घेईल.

Web Title: Regional Plan for Final Approval till March 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.