‘प्रादेशिक परिवहन’ची गाडी ‘एजंट’ मुक्त होणार

By Admin | Published: March 2, 2017 12:55 AM2017-03-02T00:55:57+5:302017-03-02T00:55:57+5:30

वाहन ४.० प्रणाली कार्यान्वित : आजपासून सर्व परवाने, कर, शुल्क आॅनलाईन भरता येणार

'Regional Transport' 'agent' will be freed | ‘प्रादेशिक परिवहन’ची गाडी ‘एजंट’ मुक्त होणार

‘प्रादेशिक परिवहन’ची गाडी ‘एजंट’ मुक्त होणार

googlenewsNext

सचिन भोसले ---- कोल्हापूर-- प्रादेशिक परिवहन कार्यालयात आता नागरिकांना मध्यस्थ अर्थात दलालांची मदत घेण्याची गरज भासणार नाही. आज, गुरुवारपासून सर्व परवाने, शुल्क, कर हे ‘वाहन ४.०’ संगणक प्रणालीतून आॅनलाईन पद्धतीने वाहनधारकांना भरता येणार आहेत. विशेष म्हणजे या प्रणालीत वाहन विक्रेत्यांची जबाबदारी वाढणार आहे.
आतापर्यंत ‘प्रादेशिक’मध्ये वाहन चालविण्याचा परवाना शुल्क, वाहन नवीन नोंदणी शुल्क, तात्पुरती नोंदणी, परिवहन विभाग नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र, नावात बदल अथवा पत्त्यांमध्ये बदल करण्याचे शुल्क, आदी कामे ही वाहनधारकांना मध्यस्थ घेतल्याशिवाय होत नाहीत असा सर्वसामान्यांचा कयास असे. आता मात्र, ही सर्व कामे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहेत. ही कामे आता घरबसल्या इंटरनेट अथवा मोबाईलवरून करता येणार आहेत. यासाठी परिवहन कार्यालयाने देशातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ‘वाहन ४.०’ ही संगणक प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यात घरबसल्या आपल्या पुराव्यांची कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्यानुसार वाहन परवाना असेल, तर त्याला चाचणी देण्यासाठी अपॉर्इंटमेंटची तारीख, तर शुल्क भरायचे असतील तर ते आरटीजीएस, मोबाईल बँकिंगद्वारेही भरले जाऊ शकणार आहे. यात वाहनधारक ते थेट कार्यालय असा संपर्क होणार आहे. नवीन वाहन खरेदी केले असेल तर कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारीही वाहन विक्रेत्यांची राहणार आहे. या प्रणालीत आपले काम कुठल्या पातळीवर आहे. त्यात कुठली कागदपत्रे अपूर्ण आहेत. त्याचा संदेश मोबाईलवर देण्याची सोय आहे. विशेष म्हणजे कागदपत्रे (पेपरलेस) काम करण्यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. याशिवाय थेट आॅनलाईन पद्धतीने शुल्क, फी, दंड, थकीत कर, आदी भरू शकणार आहोत. त्यामुळे एकूणच हे कार्यालय ‘कॅशलेस’कडे वाटचाल करणार आहे. या प्रणालीमुळे टप्प्या-टप्प्याने हे कार्यालय रोकड स्वीकारणार नाही. या संगणक प्रणालीमुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतील वाहनधारकांना ‘आरटीओ’संदर्भातील व्यवहार हे घरबसल्या करता येणार आहेत. ही प्रणाली एनआयसीकडून कार्यान्वित केली जात आहे. वाहन विक्रेत्यांना
या प्रणालीत युजर आयडी दिला जाणार आहे. नवीन वाहन विक्रीनंतर त्यांच्या कार्यालयातून पैसे भरण्याची
व कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा या प्रणालीतून मिळणार


आता थेट फॅन्सी नंबरचाही ‘ई’आॅक्शन
दुचाकी अथवा चारचाकी गाडीला फॅन्सी नंबर हवा असेल तर शुल्क भरा, धनाकर्ष काढा, असे सर्व सोपस्कर करावे लागत होते. यापुढे घरबसल्या इच्छुक वाहनधारकांना फॅन्सी नंबरच्या लिलावामध्ये मोबाईल इंटरनेटद्वारे सहभागी व पैसेही भरता येणार आहेत.


सन १९८९ च्या केंद्रीय मोटारवाहन कायदा विषय ४२/४७ ला अधीन राहून नोंदणीबाबत वाहन विक्रेत्यांची जबाबदारी आहे. त्यात काही घटना घडल्यानंतर कागदपत्रे पुरविण्याची जबाबदारीही विक्रेत्यांची आहे. त्यामुळे ‘वाहन ४.०’ या संगणक प्रणालीत विक्रेत्यांचा रोलही महत्त्वाचा ठरणार आहे. टप्प्याटप्प्याने सुरू होणाऱ्या या प्रणालीमुळे कार्यालय दलालमुक्त केले जाणार आहे.
- डॉ. डी. टी. पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: 'Regional Transport' 'agent' will be freed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.