जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार : मुंबई, ठाणे, पुण्यातून येण्यासाठी सहा हजार जणांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 06:04 PM2020-05-11T18:04:08+5:302020-05-11T18:05:10+5:30

मुंबईहून १ हजार ९४१ जणांनी, ठाण्याहून १ हजार ९६५ जणांनी व पुण्याहून २ हजार २४३ जणांनी नोंदणी केली आहे. हे तीनही जिल्हे रेडझोनमध्ये असल्याने तसेच येथून येणा?्यांची संख्या ही मोठी असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.

Registration of 6,000 people from Mumbai, Thane and Pune | जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार : मुंबई, ठाणे, पुण्यातून येण्यासाठी सहा हजार जणांची नोंदणी

जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार : मुंबई, ठाणे, पुण्यातून येण्यासाठी सहा हजार जणांची नोंदणी

Next
ठळक मुद्देपरजिल्ह्यांसह राज्यातूनही मोठा ओघ

प्रवीण देसाई

कोल्हापूर : रेड झोनह्णमध्ये असलेल्या मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून कोल्हापुरात येण्यासाठी सुमारे सहा हजार १४९ जणांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. अजून तरी जिल्हा प्रशासनाने रेड झोनमधील कोणालाही प्रवेश न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या नोंदणी केलेल्यांबाबत शासनाकडून काही निर्णय घेतला जातो का, हे पाहावे लागेल. या व्यतिरिक्त परजिल्ह्यासह परराज्यातूनही कोल्हापुरात येणा?्यांचा ओघ मोठा आहे.

जिल्ह्यातून परराज्यासह परजिल्ह्यात जाण्यासाठी व परराज्यासह परजिल्ह्यातून कोल्हापुरात येणा?्यांसाठी शासनाच्या निदेर्शानुसार जिल्हा प्रशासनाने लिंक तयार केली आहे. यावर येणा?्यांची व जाणा?्यांची आॅनलाईन नोंदणी केली जात आहे. यामध्ये कोल्हापुरात येण्यासाठी मुंबईहून १ हजार ९४१ जणांनी, ठाण्याहून १ हजार ९६५ जणांनी व पुण्याहून २ हजार २४३ जणांनी नोंदणी केली आहे. हे तीनही जिल्हे रेडझोनमध्ये असल्याने तसेच येथून येणा?्यांची संख्या ही मोठी असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.

जिल्हाधिका?्यांनी रेडझोनमधील कोणालाही जिल्ह्यात प्रवेश देणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. रेडझोनमधील व्यक्तींनी बाहेर जाऊ नये व त्यांना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये असे सरकारचेच निर्देश आहेत. परंतु यदाकदाचित यांना जिल्ह्यात प्रवेश देण्याचा निर्णय झाल्यास संपूर्ण जिल्ह्याचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. चौकट जिल्ह्यात येण्यासाठी परराज्य-परजिल्ह्यांतील नोंदणी जिल्ह्यात येण्यासाठी गुजरातहून -१८२, गोवा-११७, तेलंगणा-१०३, दिल्ली ७४, मध्यप्रदेश ३३, उत्तर प्रदेश २९, तमिळनाडू ४५, राजस्थान २५, आंध्रप्रदेश २५ जणांनी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर परजिल्ह्यांतून पालघर ५२५, सांगली ३७३, सातारा २१३, रायगड ३८२, सोलापूर ८३, सिंधुदुर्ग ९०, नाशिक ७४ जणांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी नोंदणी जिल्ह्यातून परराज्यांत जाण्यासाठी उत्तर प्रदेश ६०५१, बिहार ३७५६, कर्नाटक २७५८, राजस्थान १९८८, पश्चिम बंगाल ८६६, झारखंड ७८०, गोवा ३२४, तमिळनाडू ८२ जणांची नोंदणी झाली आहे. तर परजिल्ह्यांत जाण्यासाठी पुणे १६०६, सांगली ११३६, सातारा ३०८, रत्नागिरी ३१२, मुंबई २५३, सिंधुदुर्ग २३५, लातूर १७९, नाशिक १३५, नंदुरबार येथील १३६ जणांनी नोंदणी केली आह

Web Title: Registration of 6,000 people from Mumbai, Thane and Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.