प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन केंद्राची नोंदणी करणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:17 AM2021-02-05T07:17:03+5:302021-02-05T07:17:03+5:30

कोल्हापूर : शहररातील सर्व पाळीव प्राण्यांची दुकाने तसेच श्वान प्रजनन व विपणन केंद्राची नोंदणी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ ...

Registration of animal shops, dog breeding centers is mandatory | प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन केंद्राची नोंदणी करणे बंधनकारक

प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन केंद्राची नोंदणी करणे बंधनकारक

Next

कोल्हापूर : शहररातील सर्व पाळीव प्राण्यांची दुकाने तसेच श्वान प्रजनन व विपणन केंद्राची नोंदणी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ पुणे यांचेकडे करावी लागणार आहे तसेच ती बंधनकारक असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

देशातील सर्व प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार राज्यातील पाळीव प्राण्यांची दुकाने तसेच श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ पुणे यांच्याकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. यापुढे कोणतेही पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटर प्राणी कल्याण मंडळाची नोंदणी केले शिवाय सुरू ठेवता येणार नाही. याबाबत प्राणी क्लेश प्रतिबंधक जिल्हास्तरीय सोसायटीच्या सभेमध्ये अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी दि. ६ जानेवारी रोजी कोल्हापूर शहरातील सर्व पेट शॉप/ डॉग ब्रिडिंग सेंटरची नोंदणी करून घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

शहरातील कोणाही नागरिकांना जर श्वान तसेच इतर पाळीव प्राण्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर याबाबतची नोंदणी जिल्हा पशुसंवर्धन उप-आयुक्त कार्यालय, पाण्याचा खजिना, कोल्हापूर या ठिकाणी ३० दिवसांचे आत करणे आवश्यक आहे, जर अशी नोंदणी झाली नाही तर आपणास व्यवसाय सुरू ठेवता येणार नाही, असे पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Registration of animal shops, dog breeding centers is mandatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.