नऊ वाजता सुरू होते नोंदणी; दोन मिनिटांत हाऊसफुल्ल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:26 AM2021-05-12T04:26:03+5:302021-05-12T04:26:03+5:30
लस घेण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याचा प्रयत्न करत आहे; पण अद्याप मिळालेला नाही. दरवेळी पोर्टलवर बुकड असा ...
लस घेण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याचा प्रयत्न करत आहे; पण अद्याप मिळालेला नाही. दरवेळी पोर्टलवर बुकड असा संदेश दिसत आहे. अपॉईंटमेंट मिळविण्यासाठी दिवसभर ऑनलाईन राहावे लागत आहे. त्याचा मनस्ताप होत आहे.
-सुभाष माने, विशालनगर.
अपॉईंटमेंट घेण्याचा स्लॉट वेगवेगळ्या वेळी खुला होत आहे. कोविन ॲॅपवर मोबाईल क्रमांक नोंदविल्यानंतर सेंटर निवडून पुढील प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत अपॉईंटमेंट फुल्ल होत आहे. आठवडाभरापासून प्रयत्न करूनही अपॉईंटमेंट मिळालेली नाही.
-धनश्री रणदिवे, उचगाव.
कोल्हापुरात १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाल्यापासून ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी प्रयत्न करत आहे. पण, अद्याप ती मिळालेली नाही. अपॉईंटमेंटचा स्लॉट रोज वेगवेगळ्या वेळी खुला होत आहे. हा स्लॉट रोज सकाळी नऊ वाजता खुला करण्यात यावा.
-मुकुल शहा, राजारामपुरी.
चौकट
नागरिकांनी संयम बाळगावा
जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर आठ केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू केले आहे. तेथे ऑनलाईन नोंदणी केलेल्या १६०० जणांना रोज लस दिली जाते. उपलब्ध होणाऱ्या डोसच्या तुलनेत नोंदणी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे काही मिनिटांमध्ये नोंदणीचे सत्र संपत आहे. लसींची उपलब्धता आणि सत्राची संख्या जशी वाढेल, तशी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुलभ होईल. तोपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन लसीकरण मोहिमेचे जिल्हा समन्वयक डॉ. फारूक देसाई यांनी केले.