कोल्हापूर जिल्ह्यात दस्तऐवजांची नोंदणी आता आॅनलाईन ई-म्युटेशनद्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:44 AM2018-10-17T11:44:33+5:302018-10-17T11:54:10+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील ई-फेरफार आज्ञावलीचे कामकाज प्रगतीपथावर असून, आॅनलाईनमधील सर्व दस्तऐवजांची नोंदणी ही आॅनलाईन ई-म्युटेशन या आज्ञावलीद्वारे नोंदणी करण्यात येत आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक सुंदर जाधव यांनी दिली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील ई-फेरफार आज्ञावलीचे कामकाज प्रगतीपथावर असून, आॅनलाईनमधील सर्व दस्तऐवजांची नोंदणी ही आॅनलाईन ई-म्युटेशन या आज्ञावलीद्वारे नोंदणी करण्यात येत आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक सुंदर जाधव यांनी दिली आहे.
१२ तालुके हे आॅनलाईन सुरू असल्याने दस्त नोंदणी करताना ‘स्किप’ पर्यायाचा वापर न करता आॅनलाईन ई-म्युटेशन या आज्ञावलीद्वारे नोंदणी करण्यात येत असल्यामुळे ई-फेरफार प्रणालीमध्ये समाविष्ट ४ प्रकारच्या दस्तांची नोंदणी ई-म्युटेशन या आज्ञावलीद्वारेच दुय्यम निबंधक यांचेकडून केली जाते; परंतु भूमी-अभिलेख विभागाकडील ई-फेरफार प्रणाली संपूर्ण राज्यात ८ आॅक्टोबर २०१८ ला पूर्ण दिवस बंद असल्याने तसेच ९ आॅक्टोबरला संथगतीने व १० आॅक्टोबरला सकाळी ११.३० वाजल्यापासून एन. आय. सी. विभागाकडील काही तांत्रिक अडचणींमुळे बंद होती; त्यामुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी कामकाजावर परिणाम झाला.
याबाबत संबंधित विभागाशी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार ११आॅक्टोबरला ई-फेरफार प्रणाली सुरळीतपणे सुरू झाली आहे, अशी माहिती या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.