खासगी रुग्णालयांची नोंदणी आता ऑनलाईन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:00 IST2025-04-09T11:55:53+5:302025-04-09T12:00:00+5:30

कामगार विमा रुग्णालये सर्वांसाठी खुली

Registration of private hospitals now online Health Minister Prakash Abitkar announced | खासगी रुग्णालयांची नोंदणी आता ऑनलाईन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा 

खासगी रुग्णालयांची नोंदणी आता ऑनलाईन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा 

मुंबई/ कोल्हापूर : खासगी रुग्णालयांना नेहमी अडचणीची वाटणारी नोंदणी आणि नूतनीकरणाची प्रक्रिया आता सुटसुटीत आणि ऑनलाईन केल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली तसेच महाराष्ट्र राज्य कामगार विमा रूग्णालयात सर्वसामान्य नागरिकांवरही उपचार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने मुंबई येथे आयोजित विविध आरोग्य संस्थांना पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, गेली अनेक वर्षे ही नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत आणि ऑनलाईन व्हावी अशी मागणी डॉक्टर्सकडून होत होती. त्यासाठी त्यांना कागदपत्रे घेऊन धावपळ करावी लागत होती .परंतू ते आता बंद होणार असून आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत आहे.

दुसरी घोषणा करताना आबिटकर म्हणाले, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्यावतीने आजपर्यंत फक्त कामगारांवरच उपचार केले जात होते. यातील बहुतांशी रूग्णालये ही मोठमोठ्या शहरांमध्ये आहेत. ज्या ठिकाणी गर्दी आहे अशा ठिकाणी ही रूग्णालये आहेत. ती उत्तम उपकरणांसहित सुसज्ज आहेत. त्याचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा यासाठी या सर्व रूग्णालयांमध्ये सर्वसामान्यांना उपचार खुले करण्यात येणार आहेत. राज्यात सहा ठिकाणी सुरू करण्यात येणाऱ्या डायलेसिस सेंटरर्सचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

७० टक्के वैद्यकीय खर्चात बचत

सार्वजनिक आरेाग्य विभागाच्या अनेक योजना आहेत. परंतू त्या सर्वसामान्यांपर्यंत म्हणाव्या तशा पोहोचलेल्या नाहीत. आपल्याकडे रक्तांच्या चाचण्यांपासून डायलेसिस, सिटी स्कॅन, एक्स रे, ईसीजी सारख्या अनेक सुविधा आहेत. आपल्या विभागाच्या सर्व योजना आणि सुविधांचा जर लाभ करून घेतला तर एखाद्याच्या वैद्यकीय खर्चात किमान ७० टक्के बचत होऊ शकते, असा दावा यावेळी आबिटकर यांनी केला.

सव्हार्यकल कॅन्सर लसीकरण

राज्यातील ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी करण्याची घोषणाही आबिटकर यांनी यावेळी केली. तसेच आरोग्य संस्थांच्या निरीक्षण प्रणाली, बांधकाम प्रकल्पांच्या ऑनलाईन पोटर्लचा प्रारंभही यावेळी करण्यात आला. डॉक्टरांकडे पोहोचण्याआधी आवश्यक ठरणाऱ्या ‘सीपीआर’ थेरपीच्या प्रशिक्षण उपक्रमाचीही सुरूवात यावेळी करण्यात आली.

Web Title: Registration of private hospitals now online Health Minister Prakash Abitkar announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.