नोंदणी, मुद्रांक विभागातील कर्मचारी आजपासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:26 AM2021-09-21T04:26:09+5:302021-09-21T04:26:09+5:30

काेल्हापूर : नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील पाच ते सहा वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नत्या त्वरित करा, यासह विविध मागण्यांसाठी ...

Registration, Stamp Department employees on strike from today | नोंदणी, मुद्रांक विभागातील कर्मचारी आजपासून संपावर

नोंदणी, मुद्रांक विभागातील कर्मचारी आजपासून संपावर

Next

काेल्हापूर : नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील पाच ते सहा वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नत्या त्वरित करा, यासह विविध मागण्यांसाठी नोदंणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी आज, मंगळवारपासून संपावर जाणार आहेत. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत संपाचा इशारा नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने दिला आहे.

राज्यात नोंदणी व मुद्रांक विभागात १७०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या मागण्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत. संघटनेच्या वतीने अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा केला असला तरी त्याची सोडवणूक झालेली नाही. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

सहनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने

जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचारी आज, सकाळी दहा वाजता जिल्हा सहनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे.

कोट-

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटना अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र, प्रश्न मार्गी न लागल्याने काम बंद आंदोलन सुरू करत आहोत. जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत तोपर्यंत काम बंदच राहील.

- सागर पवार (सचिव, नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना)

Web Title: Registration, Stamp Department employees on strike from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.