रांगा लावून ‘युवा नेक्स्ट’ची नोंदणी

By Admin | Published: November 4, 2014 12:22 AM2014-11-04T00:22:50+5:302014-11-04T00:23:10+5:30

पहिला दिवस : एक हजारपेक्षा जास्त सदस्यांची नोंद

Registration of 'Young Next' by queuing | रांगा लावून ‘युवा नेक्स्ट’ची नोंदणी

रांगा लावून ‘युवा नेक्स्ट’ची नोंदणी

googlenewsNext

कोल्हापूर : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ‘मिळवा, बना, घडवा, ते सारं, जे दिल चाहता है...’ या ‘युवा नेक्स्ट’च्या नोंदणीला आज, सोमवारपासून प्रारंभ झाला. नोंदणी जरी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार असली तरी महाविद्यालयीन युवक-युवतींनी सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच लक्ष्मीपुरीतील ‘लोकमत’ शहर कार्यालयात गर्दी केली होती. गर्दी वाढल्याने रांगा लावून ही नोंदणी करण्यात आली. पहिल्याच दिवशी युवकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने एक हजारांचा टप्पा पूर्ण केला.
‘लोकमत’तर्फे महाविद्यालयीन युवक-युवतींच्या सुप्तगुणांना वाव मिळावा, त्यांची समाजात नवीन ओळख निर्माण व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने ‘युवा नेक्स्ट’च्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळेच दरवर्षी ‘लोकमत युवा नेक्स्ट’मध्ये सभासद नोंदणीला भरभरून प्रतिसाद मिळतो. यंदाची नोंदणी आजपासून सुरू झाली. नोंदणी करणाऱ्या युवक-युवतींना राज्यस्तरीय विविध कार्यक्रमांत मोफत सहभागी होता येणार असून, कोल्हापुरात होणारे सर्व कार्यक्रम पाहण्यास मिळणार आहेत. (प्रतिनिधी)

मोजक्या १०० सदस्यांनाच संधी
उद्या, मंगळवारी मोजक्याच १०० महाविद्यालयील युवक-युवतींना सदस्य होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी’ याप्रमाणे नोंदणी केली जाणार आहे. लक्ष्मीपुरीतील ‘लोकमत’ शहर कार्यालयात सकाळी १० वाजता नोंदणीला सुरुवात होणार आहे.

‘लोकमत युवा नेक्स्ट’ नोंदणीला सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी नोंदणीसाठी ‘लोकमत’ शहर कार्यालयात युवक-युवतींनी अशी मोठी गर्दी केली होती.
महाविद्यालयात फक्त दंगा-मस्ती न करता विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी, युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे हे व्यासपीठ आहे. त्यामुळे मी ‘लोकमत युवा नेक्स्ट’ची सभासद झाली आहे.
- ऋतुजा कदम
के.आय.टी. कॉलेज

‘लोकमत युवा नेक्स्ट’च्या वतीने वर्षभर नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये मला मोफत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे माझी अन्य महाविद्यालयीन युवकांशी ओळख होणार आहे. यामुळे विचारांची देवाण-घेवाण होईल.
- ओमकार जोशी,
एस. एम. लोहिया

Web Title: Registration of 'Young Next' by queuing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.