मुश्रीफांना विरोधी पक्षनेता न झाल्याचे दु:ख

By admin | Published: September 20, 2015 01:26 AM2015-09-20T01:26:01+5:302015-09-20T01:26:01+5:30

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी साधला मुश्रीफ यांच्यावर निशाणा

The regret that there is no leader of the opposition to the Mushrif | मुश्रीफांना विरोधी पक्षनेता न झाल्याचे दु:ख

मुश्रीफांना विरोधी पक्षनेता न झाल्याचे दु:ख

Next

कोल्हापूर : विधानसभेची विरोधी पक्षनेता होण्याची संधी हुकल्यामुळे हसन मुश्रीफ यांना दु:ख झाले आहे; त्यामुळे ते माझ्यावर टीका करतात. परंतु ज्यांनी सहकार बुडविला, जिल्हा मध्यवर्ती बॅँक शिल्लक ठेवली नाही, अशा व्यक्तीला माझ्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला.
‘भाजपच्या यादीत राखीव, बारावा खेळाडू म्हणजे राधाकृष्ण विखे-पाटील’ अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केल्याची बातमी वाचनात आली. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना मुश्रीफच काय, त्यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षच भाजपच्या दारात बारावा खेळाडू म्हणून उभा होता, हे राज्याला माहीत झाले आहे. मुश्रीफ यांना विरोधी पक्षनेते व्हायचं होतं. त्यांची ही संधी माझ्यामुळे हुकली; म्हणून ते आपल्यावर टीका करीत आहेत.
ते म्हणाले, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची टपाल तिकिटे रद्द करण्याच्या केंद्र सरकार निर्णय निषेधार्ह आहे. केवळ द्वेषापोटी टपाल तिकिटे रद्द करणे हा सरकारचा करंटेपणा आहे.सरकार किंवा मंत्र्यांवर जर कोणी टीका केली तर त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्याचा सरकारचा अध्यादेश पाहता, हे सरकार लोकशाहीची मुस्कटदाबी करीत आहे.

Web Title: The regret that there is no leader of the opposition to the Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.