‘हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर’ विमानसेवा नियमितपणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 02:11 PM2018-12-31T14:11:09+5:302018-12-31T14:13:36+5:30

उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सुरू झालेली हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा नियमितपणे सुरू आहे. या विमानसेवेच्या २३ व्या दिवशी रविवारी एकूण १६४ जणांनी प्रवास केला.

The regular 'Hyderabad-Kolhapur-Bangalore' aircrafts will be started | ‘हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर’ विमानसेवा नियमितपणे सुरू

‘हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर’ विमानसेवा नियमितपणे सुरू

Next
ठळक मुद्दे‘हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर’ विमानसेवा नियमितपणे सुरू१६४ जणांनी केला प्रवास

कोल्हापूर : उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सुरू झालेली हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा नियमितपणे सुरू आहे. या विमानसेवेच्या २३ व्या दिवशी रविवारी एकूण १६४ जणांनी प्रवास केला.

‘अलायन्स एअर’ या कंपनीद्वारे केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुसºया टप्प्याअंतर्गत हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गावरील विमानसेवा सुरू झाली. हवामानाच्या समस्येमुळे तीन-चार दिवसांचा अपवाद वगळता सध्या नियमितपणे या मार्गावरील विमानसेवा सुरू आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसांत एकूण १००६ जणांनी प्रवास केला.

ही सेवा दैनंदिन स्वरूपातील असून, किमान १५० प्रवासी रोज प्रवास करतात. संबंधित सेवा सुरू होऊन २३ दिवस पूर्ण झाले आहेत. रविवारी हैदराबाद-कोल्हापूर मार्गावर ३९, कोल्हापूर-बंगलोर ४२, बंगलोर-कोल्हापूर ३९, तर कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर ४४ जणांनी प्रवास केला. ही सेवा नियमितपणे सुरू आहे.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी हैदराबाद-कोल्हापूर आणि बंगलोर-कोल्हापूर या मार्गावर स्वतंत्र विमाने येणार असल्याची माहिती विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ यांनी दिली.
 

 

Web Title: The regular 'Hyderabad-Kolhapur-Bangalore' aircrafts will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.