गडहिंग्लज शहरातील बेघरांची घरे नियमित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:29 AM2021-09-15T04:29:15+5:302021-09-15T04:29:15+5:30

निवेदनात म्हटले आहे, शहरातील दुंडगे मार्ग व धबधबा मार्ग येथील ८१ बेघरांची घरे नियमित करून त्यांना पॉपर्टी कार्ड देण्याचे ...

Regularize the homes of the homeless in the town of Gadhinglaj | गडहिंग्लज शहरातील बेघरांची घरे नियमित करा

गडहिंग्लज शहरातील बेघरांची घरे नियमित करा

Next

निवेदनात म्हटले आहे, शहरातील दुंडगे मार्ग व धबधबा मार्ग येथील ८१ बेघरांची घरे नियमित करून त्यांना पॉपर्टी कार्ड देण्याचे आदेश झाले आहेत. परंतु, अद्याप त्यांची घरे नियमित होऊन प्रॉपर्टी देण्यात आलेले नाही. नगरपालिका क्षेत्रात एकूण ३२३ बेघरांची घरे असून अनेकजण बेघरही आहेत. घरे नियमित करण्याबरोबरच ज्यांना घरे नाहीत, अशा नागरिकांसाठी नवीन विकास आराखड्यात जागा आरक्षित करून जागा वाटप करा. शिष्टमंडळात, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख संतोष चिकोडे, रियाज शमनजी, तालुकाप्रमुख दिलीप माने, युवा सेनेचे प्रतीक क्षीरसागर, उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी आदींचा समावेश होता.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना निवेदन संतोष चिकोडे यांनी बेघरांच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी विजय देवणे, रियाज शमनजी, दिलीप माने, प्रतीक क्षीरसागर, काशिनाथ गडकरी आदी उपस्थित होते. (किल्लेदार फोटो)

क्रमांक : १४०९२०२१-गड-१५

Web Title: Regularize the homes of the homeless in the town of Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.