चिखलीतील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:09 AM2021-08-02T04:09:55+5:302021-08-02T04:09:55+5:30
म्हाकवे : नानीबाई चिखली (ता. कागल) येथील पुराचा फटका बसत असणाऱ्या अडीचशेहून अधिक पूरबाधित कुटुंबांचे पुनर्वसन करणार असल्याची ...
म्हाकवे : नानीबाई चिखली (ता. कागल) येथील पुराचा फटका बसत असणाऱ्या अडीचशेहून अधिक पूरबाधित कुटुंबांचे पुनर्वसन करणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. येथील सर पिराजीराव घाटगे चॅरिटेबल ट्रस्टची जमिनीत किंवा खडकेवाडा येथील भैरवनाथ देवालयाजवळ असणाऱ्या शासकीय जागेत पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली.
नानीबाई चिखली येथे पूर पाहणी दौरा करून पूरबाधितांशी संवाद साधला व धान्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आलेल्या प्रापंचिक साहित्याचे वाटपही मंत्री मुश्रीफ यांनी केले.
नागरिकांना लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रशासनाने घरांच्या नुकसानीसह शेतीचेही पंचनामे तातडीने करावेत.
चिखलीतील नुकसानीकडे मंत्री मुश्रीफ यांचे लक्ष वेधत या पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे अशी मागणी बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले यांनी केले.
यावेळी सरपंच छाया चव्हाण, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले, उपसरपंच मनीषा पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, सदाशिव दुकान, धीरज मगदूम, श्रीशैल नुल्ले, मयूर आवळेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कँप्शन
नानीबाई चिखली येथील पूरबाधित कुटुंबांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आलेल्या प्रापंचिक साहित्याचे वाटप करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी प्रवीणसिंह भोसले, सरपंच छाया चव्हाण, मनीषा पाटील, सदाशिव दुकान, तहसीलदार शिल्पा ठोकडे आदी उपस्थित होते.