आंबेओहोळ धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे मगच पाणीपूजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:07+5:302021-06-21T04:17:07+5:30
उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांचे कायद्याप्रमाणे पुर्नवसन करावे, पाणीसाठा झाला आहे. गेली वीस वर्षे कायद्याप्रमाणे पुनर्वसन ...
उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांचे कायद्याप्रमाणे पुर्नवसन करावे, पाणीसाठा झाला आहे. गेली वीस वर्षे कायद्याप्रमाणे पुनर्वसन करावे यासाठी धरणग्रस्त शांततेच्या मार्गाने लढत आहेत. मात्र धरणग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन करण्यामध्ये शासन व लोकप्रतिनिधी कमी पडले. आता पाणीपूजनाची घाई सुरू झाली आहे. हे पाणीपूजन ज्येष्ठ प्रकल्पग्रस्तांच्या हस्ते व्हावे, अशी मागणी आंबेओहोळ धरणग्रस्त संघटनेने पत्रकातून केली आहे.
धरणात पाणीही साठले मग पुनर्वसनाचे काय?
कोरोनाच्या निमित्ताने शासकीय कार्यालयात लोकांना येण्यास मज्जाव केला. मात्र घळभरणीचे काम चालूच होते. निदान आता तरी पुनर्वसनाचे काम प्राधान्याने व्हावे आणि पाणीपूजन करताना ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला व त्यामुळे धरण झाले. त्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ धरणग्रस्तांच्या हस्ते पाणीपूजन झाले पाहिजे. तत्पूर्वी पुनर्वसन पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
?????
प्रसिद्धीपत्रकावर कॉ. संपत देसाई, कॉ. अशोक जाधव, शिवाजी गुरव, सदानंद व्हनबट्टे आदींनी प्रसिद्धीस दिले आहे.