आरोपींना दहशतवादी जाहीर करा

By admin | Published: May 7, 2017 01:10 AM2017-05-07T01:10:23+5:302017-05-07T01:10:23+5:30

पानसरे, दाभोलकर हत्या प्रकरण : भाकपची मागणी; जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट

Release the accused as terrorists | आरोपींना दहशतवादी जाहीर करा

आरोपींना दहशतवादी जाहीर करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना दहशतवादीच जाहीर करा अशी थेट मागणी शनिवारी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने नूतन पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे केली. पक्षाचे राज्य सचिव नामदेव गावडे, स्मिता पानसरे, सतीशचंद्र कांबळे, आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही भेट घेतली.
पानसरे यांची १६ फेबु्रवारी २०१५ ला भर दिवसा रस्त्यावर गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. सात महिन्यांनंतर संशयित मारेकरी समीर गायकवाड याला अटक करण्यात आली. मात्र, अद्यापही सूत्रधारापर्यंत व अन्य आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सनातन संस्थेच्या धार्मिक कार्याच्या बुरख्याआडून खुनी, हिंसक, अतिरेकी कारवाया करणाऱ्या या आरोपींना दहशतवादी व अतिरेकी जाहीर केले पाहिजे व त्या संस्थेवरही बंदी घातली पाहिजे.
या संस्थेचे अनुयायी बॉम्बस्फोट, खून प्रकरणांमध्ये सापडत आहेत. यातील खरे सूत्रधार व इतर आरोपी याच संस्थेतील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संस्थेतील अनुयायींची माहिती पोलिसांकडे देणे सक्तीचे करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
यावेळी करवीरचे पोलीस उपअधीक्षक हर्ष पोद्दार उपस्थित
होते.
शिष्टमंडळात पक्षाचे कृष्णात जाधव, सम्राट मोरे, अनिल चव्हाण, बन्सी सातपुते, बी. एल. बरगे, दत्ता मोरे, धीरज कटारे, दिलदार मुजावर, आदींचा समावेश होता.


आरोपींना अटक करू
पोलीस अधीक्षक मोहिते म्हणाले,‘ या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे. अन्य आरोपींच्या अटकेसाठी ‘एसआयटी’ व स्थानिक पोलीस सर्व शक्ती पणाला लावून काम करीत आहेत. तपास अधिकारी अतिरिक्त अधीक्षक दर्जाचाच राहणार आहे. तपासास गती देऊन या प्रकरणातील आरोपींना अटक करू.’

Web Title: Release the accused as terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.