धामणीखोऱ्यातील हरपवडे येथे गाळात अडकलेल्या गव्याची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 12:26 PM2021-12-14T12:26:41+5:302021-12-14T12:28:44+5:30

भूस्खलन झालेल्या मातीच्या गाळात गवा अडकला होता. वनविभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करत या गव्याला गाळातून बाहेर काढत जीवदान दिले.

Release of a Gaur stuck in the mud at Harpawade in Dhamanikhora Panhala | धामणीखोऱ्यातील हरपवडे येथे गाळात अडकलेल्या गव्याची सुटका

धामणीखोऱ्यातील हरपवडे येथे गाळात अडकलेल्या गव्याची सुटका

Next

हरपवडे : धामणीखोऱ्यातील हरपवडे (ता.पन्हाळा) येथील जंगलालगत असलेल्या गुरवाचा नाळवा शेतात डोंगर भूस्खलन झालेल्या मातीच्या गाळात गवा अडकला होता. वनविभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करत या गव्याला गाळातून बाहेर काढत जीवदान दिले. या गव्यावर उपचार सुरू आहेत.

हरपवडे येथे यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत डोंगर खचून गुरवाचा नाळवा नावाचे शेत गाळाने गाढले आहे. याच शेतात शनिवारी पहाटे मादी गवा रेडी अन्नाच्या शोधात असताना गाळात अडकली असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी तत्काळ याबाबतची माहिती वन विभागाला दिली.  

ही माहिती मिळताच बाजार भोगाव वन परीक्षेत्र पणुत्रे बीटचे वनपाल नाथा पाटील पथकासह घटनास्थळी पोहचले. सदर गवा मादीस गाळातून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनद्वारे प्रयत्न करण्यात आला. मात्र गाळात जेसीबी चालू न शकल्याने अखेर ग्रामस्थांच्या मदतीने गव्यास दोरखंड लावून ओढून बाहेर काढण्यात यश आले.

Web Title: Release of a Gaur stuck in the mud at Harpawade in Dhamanikhora Panhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.