रिलायन्स मोबिलिटीतर्फे रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहनांना दररोज ५० लीटर मोफत इंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:22 AM2021-05-16T04:22:33+5:302021-05-16T04:22:33+5:30
कोल्हापूर : कोरोना रुग्ण नेणाऱ्या रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडतर्फे दररोज प्रत्येक वाहनाला ५० ...
कोल्हापूर : कोरोना रुग्ण नेणाऱ्या रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडतर्फे दररोज प्रत्येक वाहनाला ५० लीटरपर्यंत मोफत इंधन देणार असल्याची घोषणा कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केली आहे. मदतीचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांच्याकडे सुपुर्दही केले.
जिल्हा प्रशासन अथवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या अधिकृत पत्राव्दारे नोंदणीकृत क्रमांकाच्या वाहनांसाठी सरकारी अथवा खासगी दवाखान्यातील रुग्णवाहिका, कोरोना रुग्ण, ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने, आपत्कालीन कर्तव्यासाठी महाराष्ट्र सरकारने अधिकृत केलेली कोविड-१९ वाहनांना रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडच्यावतीने महामार्ग क्रं. ४८, अंबप फाटा, पुणे-बेंगलोर रोड, कोल्हापूर, बालिंगा, गडहिंग्लज, जयसिंगपूर, नांदणी, बिद्री या पेट्रोल पंपावर या सुविधेचा लाभ घेता येईल.
यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व जिल्हा वैद्यकीय अधिकारी डाॅ.योगेश साळे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, संचालक प्रशांत शिंदे उपस्थित होते.
फोटो: १५०५२०२१-कोल-रिलायन्स
फोटो ओळ: कोरोना रुग्ण व ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्यांना वाहनांसाठी रिलायन्स मोबिलिटीतर्फे सुरू करण्यात आलेल्या मोफत इंधन पुरवठ्याचे पत्र राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, चेंबर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे दिले.