CoronaVirus Positive News कोल्हापुरला दिलासा, पॉझिटिव्ह महिला रूग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:46 AM2020-04-17T11:46:10+5:302020-04-17T11:47:42+5:30
पुण्यातील गुलटेकडीहून बहिणीकडे कोल्हापुरात भक्तीपूजानगर येथे आलेला युवक कोरोनाचा दुसरा रूग्ण होता. त्याचेही १४ दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील तिस-या कोरोनाग्रस्त असलेल्या महिला रूग्णाचा दुसरा अहवाल शुक्रवारी सकाळी निगेटिव्ह आला आहे.
पेठवडगाव ता. हातकणंगले येथील २२ वर्षांची युवती कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली कोरोनाग्रस्त ठरली होती. ती इस्लामपूरच्या कोरोनाग्रस्त कुटुबांची नातेवाईक होती. तिचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पुण्यातील गुलटेकडीहून बहिणीकडे कोल्हापुरात भक्तीपूजानगर येथे आलेला युवक कोरोनाचा दुसरा रूग्ण होता. त्याचेही १४ दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता तिच्या बहिणीचेही दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने कोल्हापूरला हा दिलासा मिळाला आहे.
आता शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील एकाच कुटुंबाातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता तिघांच्या तब्येतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.