ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे रुग्णांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:34+5:302021-02-09T04:25:34+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे ऑक्सिजन टंचाई दूर होऊन रुग्णांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री ...

Relieve patients with oxygen generation project | ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे रुग्णांना दिलासा

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे रुग्णांना दिलासा

Next

गडहिंग्लज : गडहिंग्लज येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे ऑक्सिजन टंचाई दूर होऊन रुग्णांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

येथील उपजिल्हा रुग्णालय आवारात उभारण्यात आलेल्या ५० लाख रुपये खर्चाच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन टंचाईमुळे रुग्ण सेवेत अडचणी येत होत्या. परंतु, या प्रकल्पातून आता दररोज ऑक्सिजनचे १०० ते १२० जम्बो सिलिंडर भरतील. दोन ड्युरा सिलिंडरमध्ये एकूण ४० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन असेल. त्यामधून रुग्णालयाला उच्चदाबाने ऑक्सिजनचा पुरवठा होईल.

यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, सदस्य युवराज पाटील, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, सोमगोंडा आरबोळे आदी उपस्थित होते.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळी यांनी आभार मानले.

---------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, डॉ. दिलीप आंबोळे आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०८०२२०२१-गड-०६

Web Title: Relieve patients with oxygen generation project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.