पूरबाधित नागरिकांचे स्थलांतर करा  :चंद्रकांत जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:33 AM2020-07-07T11:33:35+5:302020-07-07T11:34:58+5:30

पूरबाधित नागरिकांचे वेळीच स्थलांतर करा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली. मागील आठवड्यामध्ये आमदार जाधव यांनी शहरात महापुरासंदर्भात पदाधिकाऱ्यांसोबत दौरा केला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

Relocate flood affected citizens: Chandrakant Jadhav | पूरबाधित नागरिकांचे स्थलांतर करा  :चंद्रकांत जाधव

कोल्हापुरात संभाव्य पूरस्थितीबाबत आमदार चंद्रकांत जाधव यांनी महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देपूरबाधित नागरिकांचे स्थलांतर करा  :चंद्रकांत जाधव

कोल्हापूर : पूरबाधित नागरिकांचे वेळीच स्थलांतर करा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली. मागील आठवड्यामध्ये आमदार जाधव यांनी शहरात महापुरासंदर्भात पदाधिकाऱ्यांसोबत दौरा केला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

आमदार जाधव यांनी शहरात २००५,२०२९ मध्ये पूर पातळी किती होती, त्यावेळी नागरिकांचे स्थलांतर कशा पद्धतीने केले होते याची माहिती घेतली. यामध्ये नेहमी पाणी किती येते, मच्छिंद्री झाली असता पाणी किती येते आणि महापुराने धोका पातळी ओलांडल्यानंतर पाणी किती येते, याचाही आढावा त्यांनी घेतला. यावेळी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्त निखिल मोरे, रमेश मस्कर, रावसाहेब चव्हाण, बाबूराव दबडे, अग्निशामन प्रमुख रणजित चिले उपस्थित होते.

उपसा पंप उचलून घ्या

बालिंगा येथील पंपिंग स्टेशन पुरात बुडाल्याने ऐन पावसाळ्यात शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होतो. त्या दृष्टीने पाण्याचे पंप उचलून घेण्याची सूचनाही आमदार जाधव यांनी यावेळी केली.

दोन्ही खणींत पाणी मिसळू नये

शहरातील टाकाळा खण व सरनाईक कॉलनी येथील कदम खणीमध्ये पावसाचे पाणी मिसळून तेथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. त्यासाठी दोन्ही खणींच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून पाणी खणीत मिसळू नये, यासाठी नियोजन करण्याचेही आमदार जाधव यांनी म्हटले.


 

Web Title: Relocate flood affected citizens: Chandrakant Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.