रेमडिसिव्हीर इंजेक्शन सर्व घाऊक विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देणार-सतेज पाटील यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 03:28 PM2020-09-05T15:28:42+5:302020-09-05T15:32:04+5:30
कोव्हिड रुग्णांसाठी जिल्ह्यातील सर्व घाऊक विक्रेत्यांकडे रेमडीसीव्हीर उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
कोल्हापूर- कोव्हिड रुग्णांसाठी जिल्ह्यातील सर्व घाऊक विक्रेत्यांकडे रेमडीसीव्हीर उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या मागणी प्रमाणे पुरवठा व्हावा. सर्वत्र उपल्बध व्हावे अशी मागणी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनची होती. एमएससीडीएचे संघटन सचिव मदन पाटील व जिल्हा असोसिएशन चे अध्यक्ष संजय शेटे यांनी पालकमंत्री पाटील यांची या मागणीसाठी भेट घेतली.
मागणीच्या प्रमाणात रुग्णांना रेमडीसीव्हीर उपलब्ध करुन दिले जाईल, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या पुरवठा दारांकडून जिल्ह्यातील घाऊक विक्रेत्यांनी आपली मागणी नोंदवून या इंजेक्शनची खरेदी करावी. छापील किंमतीनुसार याची विक्री करावी.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
1 ) Zydus health care Ltd. - Remdac inj. - Rs. 2800/-
2) Jubilant life Science - Jubi-R inj. -Rs.4700/-
3) cipla Ltd. -Cipremi inj. - Rs.4000/-
4) Hetero healthcare - Covifor inj. - 5400/-
छापील किंमती पेक्षा जादा दर आकारल्यास अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त मनीषा जवंजाळ-पाटील (मो.न.9405556424 ), व संजय शेटे, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन (मो.न. 9158982799) यांच्याकडे तक्रार करावी. या इंजेक्शनच्या उपलब्ध माहितीसाठी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन फोन नं. 2650128 येथे संपर्क करावा.