मंदिर परिसरातून फेरीवाल्यास हटवल्यास याद राखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 06:17 PM2021-02-09T18:17:58+5:302021-02-09T18:21:38+5:30
Muncipal Corporation Kolhapur- गेल्या ४० वर्षांपासून अंबाबाई मंदिर परिसरात फेरीवाले व्यवसाय करत आहेत. मुंबईतील एक निकालाचा आधार घेऊन महापालिका येथे कारवाई करू शकत नाही. मुंबई आणि कोल्हापुरातील परिस्थीत भिन्न आहे. मंदिर परिसरातून एकाही फेरीवाल्यास हटवल्यास याद राखा, असा इशारा सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीने मंगळवारी दिला.
कोल्हापूर : गेल्या ४० वर्षांपासून अंबाबाई मंदिर परिसरात फेरीवाले व्यवसाय करत आहेत. मुंबईतील एक निकालाचा आधार घेऊन महापालिका येथे कारवाई करू शकत नाही. मुंबई आणि कोल्हापुरातील परिस्थीत भिन्न आहे. मंदिर परिसरातून एकाही फेरीवाल्यास हटवल्यास याद राखा, असा इशारा सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीने मंगळवारी दिला.
कोल्हापूर महापालिकेने शहरातील अतिक्रमणावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून अंबाबाई मंदिराच्या १०० मीटरपर्यंतच्या सर्व फेरीवाल्यांना हटविण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मंगळवारी मंदिराच्या १०० मीटर पुढे येथील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी ताराबाई रोड येथे पट्टे मारण्यास सुरू केले. फेरीवाल्यांनी तसेच तेथील दुकानदारांही याला विरोध केला. फेरीवाला कृती समितीने पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महाराणा प्रताप चौकात बेठक घेतली.
यावेळी समितीचे निमंत्रक आर.के. पोवार, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, दिलीप पवार, किशोर घाटगे, शेकापचे अस्लम बागवान, रघुनाथ कांबळे, प्र.द.गणपुले, रियाज कागदी, नजीर देसाई, किरण गवळी आदी उपस्थित होते.