निर्दोष संचालकांना गैरव्यवहारातून बाहेर काढा- रामचंद्र डांगे यांचा इशारा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:52 AM2019-02-28T00:52:34+5:302019-02-28T00:53:19+5:30

येथील एस. के. पाटील बँकेच्या गैरव्यवहारास बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. संजय पाटील, नगराध्यक्ष जयराम पाटील व संचालक रामभाऊ मोहिमे हे तिघेच जबाबदार आहेत. डॉ. पाटील यांनी

Reminders of innocent directors - Ramchandra Dange's warning: | निर्दोष संचालकांना गैरव्यवहारातून बाहेर काढा- रामचंद्र डांगे यांचा इशारा :

निर्दोष संचालकांना गैरव्यवहारातून बाहेर काढा- रामचंद्र डांगे यांचा इशारा :

Next
ठळक मुद्देसंजय पाटील यांच्या घरासमोर संचालकांना घेऊन उपोषण करणार

कुरुंदवाड : येथील एस. के. पाटील बँकेच्या गैरव्यवहारास बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. संजय पाटील, नगराध्यक्ष जयराम पाटील व संचालक रामभाऊ मोहिमे हे तिघेच जबाबदार आहेत. डॉ. पाटील यांनी संचालकांना अंधारात ठेवून तंबाखू संघ, शेतीमाल प्रक्रिया, मयूर दूध संघांवर कर्ज टाकून १६ कोटी रुपये उचलले. या तिघाव्यतिरिक्त कोणत्याही संचालकाने एक रुपयाही घेतला नसल्याने यातून पाटील यांनी सर्व संचालकांना बाहेर काढावे. अन्यथा, बंगल्यासमोर निर्दोष असलेल्या सर्व संचालकांना घेऊन बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष व बँकेचे संचालक रामचंद्र डांगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

यावेळी डांगे म्हणाले, संजय पाटील बँकेचे प्रमुख होते. त्यांनी अधिकाराचा गैरवापर करीत तंबाखू संघ, शेतीमाल प्रक्रिया संघ, मयूर दूध संघ, भाजीपाला संघ, मयूर वाहतूक संघ, अशा विविध संस्थांच्या नावे कर्ज टाकून सुमारे सोळा कोटी रुपये उचलले आहेत. बँकेच्या संचलकांची मिटिंग न घेता त्यांच्या घरी जाऊन सह्या घेऊन त्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे सर्वच संचालकांवर या कर्जाची सामूहिक जबाबदारी पडली आहे. पाटील यांनी तंबाखू संघाचे पेट्रोल पंप, जमिनी आहेत त्या विकून कर्जे भागवून संचालकांची सुटका करावी. याबाबत सर्व संचालकांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगून निवेदन देणार आहे. संचालकांच्या आक्रमकतेमुळे एस. के. पाटील बँक पुन्हा चर्चेत आली आहे.

संजय पाटील कोल्हापूर जिल्ह्याचा मल्ल्या
संजय पाटील यांनी विविध संस्थांच्या नावे कर्जे टाकून पूर्ण बँकच घशात घातली आहे. सामूहिक जबाबदारी म्हणून संचाकांवर कायदेशीर मालमत्तेच्या जप्तीच्या नोटिसा आल्या आहेत. मात्र, याची कोणतीही जाणीव पाटील यांना नसून, निवांतपणे ऐश आरामात फिरत आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा हा मल्ल्याच असून, त्याची आता सुटका होऊ देणार नसल्याचेही डांगे यांनी सांगितले.

ह्यलोकमतह्णचे वृत्त खरे
ह्यलोकमतह्णने संजय पाटील यांनी अपहाराची रक्कम त्वरित भरावी, उच्च न्यायालयाचे आदेश या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. पाटील यांनी दाखल केलेले ८८ कलम फेटाळल्याने संचालकांनी वसुलीच्या तगाद्यातून पाटील यांची डोकेदुखी वाढणार, असे संकेत दिले होते. वृत्त खरे ठरल्याने डांगे यांनी पत्रकार बैठकीत  लोकमतच्या बातमीचे कात्रण दाखवत वस्तुस्थिती असल्याचे सांगितले.


 

Web Title: Reminders of innocent directors - Ramchandra Dange's warning:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.