अंबाबाईच्या पुजाऱ्यांना पंधरा दिवसांत हटवा
By admin | Published: June 22, 2017 05:14 AM2017-06-22T05:14:12+5:302017-06-22T05:14:12+5:30
श्री पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर मंदिरांप्रमाणे अंबाबाई मंदिरातील तथाकथित हक्कदार पुजाऱ्यांना १५ दिवसांत मंदिर प्रवेश बंदी करण्यात यावी व त्याजागी बहुजन समाजातील पुजाऱ्यांची
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : श्री पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर मंदिरांप्रमाणे अंबाबाई मंदिरातील तथाकथित हक्कदार पुजाऱ्यांना १५ दिवसांत मंदिर प्रवेश बंदी करण्यात यावी व त्याजागी बहुजन समाजातील पुजाऱ्यांची ‘पगारी नोकर’ म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन बुधवारी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.
अंबाबाई भक्तांच्या वतीने सुरू असलेल्या ‘पुजारी हटाओ’ आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून बुधवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. आंदोलकांची संख्या मोठी असल्याने ताराराणी सभागृहात मागणीचे निवेदन दिले. या वेळी पालकमंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे सांंगितले.