घरकुल योजनेतील त्रुटी दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2016 12:04 AM2016-01-04T00:04:55+5:302016-01-04T00:33:21+5:30

संजय मंडलिक : जनजागृती अभियान राज्यात पोहोचविणार; इंदिरा आवास लाभार्थ्यांचा मेळावा

Remove the cortex scheme errors | घरकुल योजनेतील त्रुटी दूर करा

घरकुल योजनेतील त्रुटी दूर करा

Next

मुरगूड : आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांसाठी इंदिरा आवास घरकुल योजनेद्वारे शासनाकडून दिले जाणारे अनुदान अगदीच तुटपुंजे आहे. हे अनुदान दुप्पट होण्यासाठी, तसेच या लाभार्थ्यांच्या अन्य त्रुटी दूर करण्यासाठी सुरू झालेले जनजागृती अभियान मुरगूड शहरापासून संपूर्ण राज्यभर पोहोचविण्यासाठी आपण अग्रक्रमाने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केले.
मुरगूड (ता. कागल) येथील हुतात्मा तुकाराम वाचनालयाच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या इंदिरा आवास लाभार्थ्यांच्या मेळाव्यात अध्यक्षपदावरून प्रा. मंडलिक बोलत होते. यावेळी वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी, उत्तम चौगले, संदीप बोटे, राजू सरनाईक, दिलीप कांबळे यांनी विविध ११ ठराव मांडले.
यावेळी प्रा. संजय मंडलिक यांनी, या लाभार्थ्यांना शासनाकडून जाचक अटी लादल्या आहेत, असे सांगून सध्या निर्धारित जागा, चटई क्षेत्र २५० स्केअर फूट दिले जाते. या जागेमध्ये घर बांधणे शक्यच नसल्याने ती जागा दुप्पट म्हणजे ५०० स्केअर फूट इतकी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. साधारणत: कागल तालुक्यात तीन हजार लाभार्थी असून, अद्याप ५२१४ लोक या योजनेपासून वंचित आहेत. त्यांना लाभ मिळण्यासाठी व जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार व आपण संयुक्तपणे कार्य करणार असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.
सर्जेराव अवघडे यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पंचायत समिती सदस्या मनीषा सुतार यांच्या हस्ते झाले. आर. डी. पाटील, कुरुकलीकर, रवी कांबळे, अनिल सिद्धेश्वर, मधुकर सुतार, शहाजी गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली. मेळाव्यास राजेखान जमादार, नारायण मुसळे, किरण गवाणकर, सुहास खराडे, शिवाजीराव चौगले, अमर पाटील, गणपतराव लोकरे, दिलीप कांबळे, चंद्रशेखर कोरे, प्रा. एकनाथ चौगुले, युवराज लाटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Remove the cortex scheme errors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.