टेंबलाईवाडीतील ओपनस्पेसवरील अतिक्रमण हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:30+5:302021-02-07T04:21:30+5:30
कोल्हापूर : टेंबलाईवाडी, प्रगती सहकारी गृहनिर्माण संस्था येथील महापालिकेच्या ओपनस्पेसवरील अतिक्रमण हटवा, अशा मागणीचे निवेदन परिसरातील नागरिक फिरोज शमसुद्दीन ...
कोल्हापूर : टेंबलाईवाडी, प्रगती सहकारी गृहनिर्माण संस्था येथील महापालिकेच्या ओपनस्पेसवरील अतिक्रमण हटवा, अशा मागणीचे निवेदन परिसरातील नागरिक फिरोज शमसुद्दीन शेख यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना दिले.
यामध्ये म्हटले आहे की, गेल्या दहा वर्षांपासून येथील ओपनस्पेसवर दोन खोल्या व तारेचे कुंपण घालून अतिक्रमण केले आहे. संबंधितांनी महापालिकेकडे अर्ज करून बांधकाम पाडू नये, त्याचा वापर सामाजिक कार्यासाठी करा असा केला आहे. अतिक्रमण पाडण्यापासून वाचविण्याचा हा प्रयत्न आहे. हा अर्ज फेटाळून अतिक्रमणावर कारवाई करण्यास चालढकलपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी. अतिक्रमण करणाऱ्या अशा व्हाईट कॉलर गुन्हेगारांना महापालिकेच्या निवडणुकीपासून रोखण्यात यावे. शहरातील इतर अतिक्रमणावर कारवाई केली जात आहे. मात्र, येथील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत आहे. प्रथम येथील अतिक्रमण हटवा आणि मग ८ तारखेपासून शहरात कारवाई सुरू करा.