वळिवड्याच्या ओढ्यावरील अतिक्रमण काढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:16 AM2021-06-27T04:16:47+5:302021-06-27T04:16:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गांधीनगर : गडमुडशिंगी, उचगाव-वळीवडे हद्दीतून वाहणाऱ्या ओढ्यावरील अतिक्रमणावर कारवाई करु, असे आश्वासन करवीरचे नायब तहसीलदार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गांधीनगर : गडमुडशिंगी, उचगाव-वळीवडे हद्दीतून वाहणाऱ्या ओढ्यावरील अतिक्रमणावर कारवाई करु, असे आश्वासन करवीरचे नायब तहसीलदार विपिन लोकरे यांनी दिल्यानंतर दलित महासंघाचे शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी सुरू केलेले धरणे आंदोलन अखेर मागे घेतले. कांबळे यांनी याप्रश्नी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. आंदोलक राजू कांबळे हे शुक्रवारी अचानक गायब झाल्याने पोलिसांची भंबेरी उडाली. त्यांची रात्री शोधाशोध सुरू झाली. जलसमाधी घेण्यासाठी निगडेवाडी येथील पंचगंगा नदीच्या घाटावर गेलेल्या राजू कांबळे यांना वाहतूक सेनेचे रामभाऊ साळुंखे यांनी आंदोलनस्थळी आणले. नायब तहसीलदार विपिन लोकरे यांनी कांबळे यांच्याशी चर्चा करुन ओढ्यावरील अतिक्रमणाबाबत तहसीलदारांचे कारवाईबाबतचे पत्र कांबळे यांना देण्यात आले. याप्रश्नी सर्व संबंधित घटकांची तहसीलदारांसमवेत बैठक घेण्याचे ठरल्यानंतर कांबळे यांनी आंदोलन स्थगित केले.