वडगाव पालिकेच्या व्यापारी संकुलातील अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:23 AM2021-03-06T04:23:13+5:302021-03-06T04:23:13+5:30

शहरातील मध्यवर्ती व मोक्याच्या जागेवर महालक्ष्मी व्यापारी संकुल आहे. पॅसेजमध्ये एका अज्ञाताने जागा आखत चक्क अतिक्रमण केले आहे. राजकीय ...

Removed the encroachment in the commercial complex of Wadgaon Municipality | वडगाव पालिकेच्या व्यापारी संकुलातील अतिक्रमण काढले

वडगाव पालिकेच्या व्यापारी संकुलातील अतिक्रमण काढले

Next

शहरातील मध्यवर्ती व मोक्याच्या जागेवर महालक्ष्मी व्यापारी संकुल आहे. पॅसेजमध्ये एका अज्ञाताने जागा आखत चक्क अतिक्रमण केले आहे. राजकीय वरदहस्तातून ‘आदेश’ मिळाल्यामुळे याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते, अशी चर्चा पालिका वर्तुळातही सुरू होती. पालिकेच्या व्यापारी संकुलात बेकायदेशीर अतिक्रमण केल्याबाबत ‘लोकमत’ने १ मार्चला वृत्त प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची दखल पालिका प्रशासनाने घेतली. याचदिवशी बांधकाम विभागाने पंचनामा करून अतिक्रमण काढण्यासाठीचा अहवाल कर विभाग यांना दिला होता. दरम्यान संबंधिताने अतिक्रमण काढून घेण्यास मुदत मागितली होती. मात्र या मुदतीत अतिक्रमण न काढल्यामुळे प्रशासनाने काढले. यावेळी कर निरीक्षक स्वप्नील रानगे, सूर्याजी भोपळे, अमिन तांबोळी, मेघराज घोडके, उदयकुमार डोंगरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

चौकट - पुन्हा नवीन समस्या

हे अतिक्रमण पालिकेने काढून घेतले असले तरी शेजारील गाळेधारकाने येथे दुकानातील वस्तू विक्रीसाठी ठेवून खुले अतिक्रमण केले आहे. हेही अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा कारवाई करू अशी सडेतोड भूमिका कर विभागाने घेतली आहे.

फोटो - ०५०३२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - वडगाव येथे पालिकेने व्यापारी संकुलातील अतिक्रमण हटविले.

Web Title: Removed the encroachment in the commercial complex of Wadgaon Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.