रिंगण सोहळा ठरला आकर्षण
By Admin | Published: June 15, 2017 11:19 PM2017-06-15T23:19:19+5:302017-06-15T23:20:22+5:30
हिंगोली :संत नामदेव महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा हिंगोलीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
प्रकाश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : केवळ पाच गुंठे जमिन व पाच जनावरांच्या जीवावर तीन मुलांच्या संसाराचा गाडा चालवणाऱ्या आईला मदत करत करत कुडित्रे ता करवीर येथील काजल भामटेकरने दहावीच्या परिक्षेत ९४.२0 टक्के गुण मिळवून आपल्या आईच्या हिमतीला गोडवा निर्माण करून दिला आहे. या यशाने गावातच नव्हे तर कुंभी कासारी पंचक्रोशीत काजलच्या कौतुक होत आहे.
काजल पाचवीत असतानाच तीच्या वडीलांचे निधन झाले. गावातील फक्त पाच गुंठे जमिन. लहान दोन मुली व एक मुलगा यांचे पालन पोषण बरोबरच शिक्षणाची सर्व जबाबदारी आई सविता यांच्या खांद्यावर आली. पण हिंमत नाही हरता सविता यांनी मुलगी काजल हिच्यातील गुणवत्ता पाहून नेटाने शिक्षण देण्यास सुरुवात केली काजलनेही आई च्या आपेक्षांची कधी उपेक्षा केली नाही. अगदी पहिली पासून वर्गातील पहिला क्रमांक कधी सोडला नाही.
आई शेतमजूरीला गेल्या नंतर घर कामाबरोबर जनावरांची निगा करण्याची जबाबदारी उचलून काजल भामटेकरने आपल्या आईला मदत केली. एवढेच काय पण दुस?र्या च्या शेतातुन जनावरांना चारा ही आणुन आईला मदत केली घर कामातुन सवडच मिळत नसल्याने काजलला शाळेत जेवढे शिकवले त्यावरच अभ्यास करावा लागत होता पण कोणतीही तक्रार नाही करता काजल कामातुन वेळ काढत
शाळेतुन आल्यावर किमान दोन तास लिखाण व लिखाण संपले की पाच ते सहा तास अभ्यास असा नित्यक्रम ठेवला. नेमके परीक्षेच्या आदल्या दिवशी काजलच्या पायाला मोठी दुखापत झाली. पण त्या संकटावर मात करत काजलने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. तिला हिंदी ९८, इंग्रजी ९१ , गणित ९३, सायन्स & टेक्नॉलॉजी - ९८, सोशल सायन्स ९१, तर मराठी विषयाला ८१ मार्क मिळेल आहेत. कुडित्रे केंद्रात काजल पहिली आली आहे.
तिला मुख्याध्यापक सीमा एम सातपुते, वर्ग शिक्षक संजय पाटील, पयर्वेक्षक एस बी पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
वडीलांच्या मर्त्य नंतर आई ने हिमतीने मला शिकवले. प्रसंगी आईलाही मदत व्हावी म्हणून बरोबर जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जाणे घर काम आवरून अभ्यास करावा लागत होता त्यातच परीक्षेच्या आदल्या दिवशी चित्र पाया दुखवला पण अभ्यास वर लक्ष केंद्रित करून यश मिळविले पण अजून टक्के वारी हवी होती. त्यासाठी रिचेकिंगला अर्ज करणार आहे.
काजल भामटेकर