कोडोलीत शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे नुतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 06:27 PM2020-08-31T18:27:04+5:302020-08-31T18:31:35+5:30
कोडोली ( ता पन्हाळा ) येथील छत्रपती शिवाजी चौकाचे व शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे केलेल्या सुशोभीकरण व नुतनीकरणचे लोकार्पण सोहळा रविवारी सायकाळी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती अमरसिंह पाटील हे होते.
कोडोली : कोडोली ( ता पन्हाळा ) येथील छत्रपती शिवाजी चौकाचे व शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे केलेल्या सुशोभीकरण व नुतनीकरणचे लोकार्पण सोहळा रविवारी सायकाळी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती अमरसिंह पाटील हे होते.
येथील शिवाजी चौकाचे सुशोभिकरण करण्याबाबत नागरीकांची मागणी होती. त्यामुळे कोडोली ग्रामपंचायत व आमदार फंडातील निधी असे सयुक्त पन्नास लाख रुपये खर्चुन पुतळ्याचे सुशोभीकरण व नुतनीकरण करण्यात आले आहे.
माजी आमदार सत्यजित पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात आमदार फंडातून १० लाख ६८ हजार दिले होते तर उर्वरीत निधी कोडोली ग्रामपंचायतीच्या फंडातील असे एकूण पन्नास लाख रुपये खर्चून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व नुतनीकरण करण्यात आले. यावेळी या उपक्रमात सक्रियपणे काम केलेल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरपंच शंकर पाटील, उप सरपंच चंद्रभागा जाधव, जिल्हा परिषद सदस्य विशांत महापुरे, माजी सभापती गीतादेवी पाटील, ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम, माजी सरपंच नितीन कापरे, निखिल पाटील, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे, वारणा साखर कारखाना संचालक सुरेश पाटील, वारणा बँकेचे संचालक डॉ प्रशांत जमणे, प्रमोद कोरे, जनसुराज्य प्रवक्ते अॅड. राजेंद्र पाटील, अमरबाबा पाटील, यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य नागरिक उपस्थित होते.