कोल्हापूर: प्रख्यात चित्रकर्ती डॉक्टर नलिनीताई भागवत यांचे निधन

By विश्वास पाटील | Published: September 15, 2022 03:52 PM2022-09-15T15:52:24+5:302022-09-15T15:53:05+5:30

बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून पीएचडी केली व भारतातील पहिल्या पीएचडी करणाऱ्या स्त्री चित्रकर्ती ठरल्या

Renowned painter Dr. Nalinitai Bhagwat passed away | कोल्हापूर: प्रख्यात चित्रकर्ती डॉक्टर नलिनीताई भागवत यांचे निधन

कोल्हापूर: प्रख्यात चित्रकर्ती डॉक्टर नलिनीताई भागवत यांचे निधन

Next

कोल्हापूर :  प्रख्यात चित्रकर्ती डॉक्टर नलिनीताई भागवत (वय 84) यांचे आज गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा पंचगंगा स्मशानभूमीसाठी आज दुपारी चार वाजता त्यांच्या शाहूपुरी येथील राहत्या घरातून निघणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी त्यांच्या दोन उच्चशिक्षित बहिणी, भाचे असा मोठा परिवार आहे.

गुरुवर्य दत्तोबा दळवी यांच्या काळात दळवीज मधील त्या महत्वपूर्ण विद्यार्थिनी होत्या आणि प्राचार्य उषाताई वडेर यांच्या बरोबरीने शिक्षिका म्हणून सेवा केली. पुढे त्या बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून पीएचडी केली व भारतातील पहिल्या पीएचडी करणाऱ्या स्त्री चित्रकर्ती ठरल्या. तसेच त्या मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्राध्यापक सेवा करून निवृत्त झाल्या होत्या.

त्यांना 2015 साली राज्य शासनातर्फे राज्य कला प्रदर्शनात गौरवण्यात आले होते. नाशिकच्या वा गो कुलकर्णी कलानिकेतन महाविद्यालय आणि कोल्हापुरातील रंगबहार या संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

Web Title: Renowned painter Dr. Nalinitai Bhagwat passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.