ख्यातनाम चित्रकार सुधा मदन यांचे निधन

By संदीप आडनाईक | Published: August 2, 2024 03:25 PM2024-08-02T15:25:01+5:302024-08-02T15:25:35+5:30

कोल्हापूर : मूळच्या कोल्हापूरच्या पण मुंबईत स्थायिक ख्यातनाम चित्रकार सुधा मदन म्हणजेच पूर्वाश्रमीच्या सुधा पांडुरंगराव ऊपळेकर यांचे (वय ९६) ...

Renowned painter Sudha Madan passed away | ख्यातनाम चित्रकार सुधा मदन यांचे निधन

ख्यातनाम चित्रकार सुधा मदन यांचे निधन

कोल्हापूर : मूळच्या कोल्हापूरच्या पण मुंबईत स्थायिक ख्यातनाम चित्रकार सुधा मदन म्हणजेच पूर्वाश्रमीच्या सुधा पांडुरंगराव ऊपळेकर यांचे (वय ९६) शुक्रवारी सकाळी मुंबईत वार्धक्याने निधन झाले. कोल्हापुरातील ऊपळेकर परिवारात जन्मलेल्या सुधा मदन यांचे वडील सराफी व्यवसायात होते. चित्रकार अनिल ऊपळेकर आणि पत्रकार राजा ऊपळेकर यांच्या त्या सख्ख्या चुलत भगिनी होत.

म्हैसूर येथील संग्रहालयातील ग्लोरी ऑफ होप हे गाजलेले चित्र रेखाटणाऱ्या सावळाराम लक्ष्मण तथा एस. एल. हळदणकर यांच्या शिष्या सुधा मदन यांनी मुंबईत जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधून जी.डी.आर्ट आणि आर्ट मास्टर हे अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यांना जे.जे.स्कूलची फेलोशिपही मिळाली होती. जलरंग आणि तैलरंगात क्लासिकल तसेच इम्प्रेशनिस्ट शैलीतील चित्रे ही खासियत असणाऱ्या सुधा यांची देशभरात शंभराच्या घरात चित्रप्रदर्शने झाली होती. 

राष्ट्रीय पातळीवर तीन सुवर्णपदके तसेच अनेक रौप्यपदके सुधा यांनी जिंकली होती. द आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या व्यवस्थापन समितीच्या माजी सदस्य असणाऱ्या सुधा याना दिल्ली येथील ऑल इंडिया फाईन आर्टस ॲंड क्राफ्ट्स् सोसायटीने सन्मानित केले होते. २००० मध्ये विजू सडवेलकर ॲवॉर्ड सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला होता.

Web Title: Renowned painter Sudha Madan passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.