भाडेकरुचा घरमालकास पावणेपाच लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:18 AM2021-06-28T04:18:23+5:302021-06-28T04:18:23+5:30
कोल्हापूर : पत्रकार असल्याचे भासवून मुलाला रेल्वे पोलिसात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून भाडेकरूनेच घरमालकाला पावणे पाच लाखांचा गंडा घातल्याचा ...
कोल्हापूर : पत्रकार असल्याचे भासवून मुलाला रेल्वे पोलिसात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून भाडेकरूनेच घरमालकाला पावणे पाच लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला. याबाबत करवीर पोलिसात संशयितावर गुन्हा दाखल झाला. निखिल चंद्रशेखर घोरपडे (वय २६, रा. बाजारपेठ अंबाबाई मंदिराशेजारी, हुपरी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. ही घटना पाचगाव येथे घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाचगाव येथे मनोहर तुकाराम पाटील हे राहतात, त्यांच्या घरी भाडेकरू म्हणून निखिल घोरपडे हा राहत होता. त्याने घरमालकाला आपण पत्रकार असल्याचे सांगून मुंबई रेल्वेतील अनेक वरिष्ठ अधिकारी ओळखीचे असल्याच्या भूलथापा लावल्या. त्याने तुमच्या मुलाला रेल्वे पोलीसमध्ये नोकरी लावतो असे आमिष घरमालक पाटील यांना दाखवले. पाटील यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला रोख, धनादेश आणि ऑनलाईन अशा माध्यमातून ४ लाख ७६ हजार रूपये दिले. हा प्रकार दि. २ जून ते ५ सप्टेंबर २०१९ अखेर घडला. पण निखिलने पैसे घेऊनही नोकरी न लावता फसवणूक केल्याची फिर्याद पाटील यांनी दिली. त्यानुसार संशयित निखिल घोरपडेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आला.