तटबंदीची दुरुस्ती करा, दलित महासंघाचे मंगळवारपासून ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:20 IST2020-12-03T16:07:37+5:302020-12-03T16:20:28+5:30
fort, kolhapur, Archaeological Survey of India शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळगडाची अनेक वर्षांपासून पडझड सुरु आहे. याकडे तहसिलदार, वनविभाग, पंचायत समिती तसेच पुरातत्व विभागाकडून दुर्लक्ष होत आले आहे. या उदासिन प्रशासनाविरोधात भारतीय दलित महासंघ १५ डिसेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे, अशी माहिती महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख राजीव सोरटे यांनी दिली आहे.

तटबंदीची दुरुस्ती करा, दलित महासंघाचे मंगळवारपासून ठिय्या आंदोलन
पन्हाळा/कोल्हापूर : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळगडाची अनेक वर्षांपासून पडझड सुरु आहे. याकडे तहसिलदार, वनविभाग, पंचायत समिती तसेच पुरातत्व विभागाकडून दुर्लक्ष होत आले आहे. या उदासिन प्रशासनाविरोधात भारतीय दलित महासंघ १५ डिसेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे, अशी माहिती महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख राजीव सोरटे यांनी दिली आहे.
किल्ले पन्हाळगडाची गेल्या कित्येक वर्षापासून पडझड सुरू आहे. परंतु याकडे स्थानिक प्रशासनाकडून नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे. काही ठिकाणी पन्हाळगडाची तटबंदी पूर्णत: ढासळली आहे. याकडे असेच दुर्लक्ष झाल्यास माळीण गावाप्रमाणे पन्हाळाही खचण्याची शक्यता भारतीय दलित महासंघाने पुरातत्व खात्यासह स्थानिक प्रशासनाला दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.
पन्हाळगडाच्या पायथाशी असणारी गावे तसेच पन्हाळगडावरील रहिवाशी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली जाण्याची प्रशासन वाट पहात आहे, का असा सवालही महासंघाने केला आहे. पन्हाळगडावरील पडझडीच्या दुरुस्तीबाबत पुरातत्त्व विभाग कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही. या उदासिन प्रशासनाला जाग आणण्यासाठी महासंघाचे कार्यकर्ते १५ डिसेंबरपासून पन्हाळा तहसिलदार कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे.
पन्हाळा तहसिल, नगरपरिषद, वन विभाग, पंचायत समीती, भारतीय पुरातत्व विभाग, पन्हाळा पोलिस निरिक्षक यांच्याकडे यासंदर्भातील निवेदन महासंघाने दिले आहे. या निवेदनावर पन्नालाल इंगळे, सतिश कासे, प्रदिप माने, चंद्रकांत काळे, सागर घोलप, मनोहर खोत, गणेश कांबळे, आकाश कांबळे, विक्रम समुद्रे, कादीर मुजावर, मिलिंद जवंजाळे, शितल गवंडी, अक्षय सोरटे, शाम बानकर, संग्राम बानकर, गणेश गायकवाड, प्रविण राऊत आणि सागर कांबळे यांच्या सह्या आहेत.